जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गुरुवारी झालेल्या एका रोमांचक FIFA World Cup 2026 फिफा विश्वचषक सामन्यात पोर्तुगालने Portugal vs Croatia क्रोएशियाचा 2-1 असा पराभव करत FIFA World Cup Knockout राऊंड ऑफ 16 मध्ये धडक मारली. या सामन्यादरम्यान, पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्डोने विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.
41 वर्षे आणि 147 दिवस वय असताना, सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये पेनल्टीवर गोल करून रोनाल्डोने हा विक्रम आपल्या नावावर केला.
या सामन्यापूर्वी, फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल करणाऱ्या सर्वात वयस्कर खेळाडूचा विक्रम लिओनेल मेस्सीच्या नावावर होता. मात्र, रोनाल्डोने हा विक्रम मोडीत काढत इतिहास घडवला. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या बाद फेरीतील रोनाल्डोचा हा पहिलाच गोल होता, ज्यामुळे ही कामगिरी अधिकच खास ठरली.
सामन्याच्या उत्तरार्धातील स्टॉपेज टाइममध्ये, राफेल लिओच्या अचूक पासवर गोंसालो रामोसने शानदार हेडरद्वारे निर्णायक गोल केला. त्याआधी, ख्रिस्टियानो रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करून सामना बरोबरीत आणला होता. या विजयासह पोर्तुगालने ‘राऊंड ऑफ 16’ मध्ये प्रवेश केला, तर क्रोएशियाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.
या सामन्यासोबतच क्रोएशियाचा दिग्गज खेळाडू लुका मॉड्रिचच्या पाचव्या विश्वचषक मोहिमेचाही समारोप झाला.
53व्या मिनिटाला इव्हान पेरिसिचने गोल करत क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली होती. जोसिप स्टॅनिसिकच्या ‘क्रॉस’वर पेरिसिचने अचूक फिनिशिंग करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, 68व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर गोल करत स्कोर 1-1 अशी बरोबरीवर आणली. मात्र, गोंसालो रामोस हा या सामन्याचा खरा नायक ठरला. त्याने स्टॉपेज टाइमच्या चौथ्या मिनिटाला विजयी गोल करत पोर्तुगालसाठी 2-1 असा विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, हा गोल झाला तेव्हा रोनाल्डो मैदानाबाहेर बेंचवर बसला होता.
या विजयासह, पोर्तुगाल आता राऊंड ऑफ 16 मध्ये स्पेनचा सामना करण्यास सज्ज झाला आहे.






