इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. यामधील पहिला सामना बुधवारी (१ जुलै) खेळला गेला, ज्यामध्ये भारताचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद १०० षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला. त्याने आपल्या ५९ धावांच्या खेळीत ४ षटकार मारले. त्यामुळे तो या फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला.
ज्या संघामधील सर्वाधिक खेळाडूंनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारण्याची कामगिरी केली ती यादी पाहिली तर भारत संयुक्तपणे अव्वल स्थानी आहे. भारताबरोबर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघाच्याही ५ खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.
वेस्ट इंडिजकडून पॉवेल, निकलस पूरन, ख्रिस गेल, लेविस, आणि शिमरन हेटमायर यांनी तर न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टील, ग्लेन फिलिप्स, टीम सिफर्ट, कॉलिन मुन्रो आणि फिन ऍलन यांनी आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला आतापर्यंत ही कामगिरी करता आली नाही.
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने २०५ षटकार मारले आहेत. या यादीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांचाही समावेश आहे. आता त्यामध्ये अभिषेकची भर पडली आहे. (most players by team with 100+ sixes in T20I matches)
भारतासाठी टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
२०५ – रोहित शर्मा
१७९ – सूर्यकुमार यादव
१२६ – हार्दिक पंड्या
१२४ – विराट कोहली
१०२ – अभिषेक शर्मा*
टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रत्येक संघासाठी १०० षटकार मारणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर भारत, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी ५ खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या ४ (ग्लेन मॅक्सवेल, ऍरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श), इंग्लंडच्या (जोस बटलर, इऑन मॉर्गन), दक्षिण आफ्रिका (क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर) , श्रीलंका (कुशल मेंडिस, दसुन शनाका) आणि अफगाणिस्तानच्या (मोहम्मद नबी, रहमानउल्ला गुरबाज) प्रत्येकी २ खेळाडूंनी केली आहे.
तसेच झिम्बाब्वे (सिकंदर रझा) आणि आयर्लंडच्या (पॉल स्टर्लिंग) प्रत्येकी एका खेळाडूने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले आहेत. या यादीत पाकिस्तानबरोबर बांगलादेशचा एकही खेळाडू नाही. पाकिस्तानच्या फखर जमानने टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत ९९ षटकार मारले आहेत.





