---Advertisement---

अभिषेक शर्माने मोडला जगातील सर्वात मोठा विक्रम; फक्त 785 चेंडूंमध्ये केला भीमपराक्रम

On: गुरूवार, जुलै 2, 2026 9:55 AM
---Advertisement---

टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. (Abhishek Sharma Record) चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात, अभिषेकने वेस्ट इंडीजच्या एविन लुईसचा विक्रम मोडीत काढत सर्वात कमी चेंडूंमध्ये टी20 मध्ये 100 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. (Abhishek Sharma 100 Sixes) केवळ 20 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेकने आपल्या खेळीदरम्यान तीन षटकार मारले आणि टी20 मध्ये 100 षटकारांचा टप्पा गाठण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक उत्कृष्ट लयीत होता. त्याने इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत अवघ्या 20 चेंडूंमध्ये धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. ज्यात त्याने तीन उत्तुंग षटकार ठोकले. या सामन्यापूर्वी त्याला 100 षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ दोन षटकारांची गरज होती, परंतु त्याने त्याहून अधिक कामगिरी केली. आपल्या खेळीत तिसरा षटकार मारून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील आपली एकूण षटकारांची संख्या 101 वर नेली.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये (Fastest 100 Sixes T20I) 100 षटकार ठोकण्याचा जागतिक विक्रम आता अधिकृतपणे अभिषेक शर्माच्या नावावर आहे. या यादीत त्याच्यानंतर एविन लुईस, फिन ॲलन, टिम डेव्हिड आणि सूर्यकुमार यादव यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा क्रमांक लागतो.

टी20 मध्ये 100 षटकार पूर्ण करण्यासाठी लागलेले सर्वात कमी चेंडू (Fastest 100 Sixes T20I)

अभिषेक शर्मा (भारत): 785 चेंडू
एविन लुईस (वेस्ट इंडीज): 789 चेंडू
फिन ॲलन (न्यूझीलंड): 871 चेंडू
टिम डेव्हिड (ऑस्ट्रेलिया): 939 चेंडू
सूर्यकुमार यादव (भारत): 1007 चेंडू

मालिकेतील दुसरा सामना 4 जुलै रोजी मँचेस्टर येथे (IND vs ENG 2nd T20) खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---