मार्च महिन्यात गाजलेल्या बॉल टॅम्परींग प्रकरणानंतर बॉल टॅम्परींगचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
सेंट ल्युसिया येथे सुरू असलेल्या विंडीज वि. श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या शुक्रवार दि. 15 जून रोजी दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात हा प्रकार घडला.
श्रीलकेचा कर्णधार दिनेश चंदिमल बॉलशी छेडछाड करत असल्याचे व्हिडीओ फूटेजमध्ये निष्पन्न झाले आहे.
या व्हीडीओच्या आधारे मैदानावरील पंचांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवार दि. 16 जूनला खेळ सुरू होताना श्रीलंकेला दंड म्हणून विंडीज संघाला पाच धावा बहाल करून बॉल बदलण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावर श्रीलंकन संघाने नाराजी दर्शवत तिसऱ्या दिवशी तब्बल दोन तास उशीरा मैदानावर उतरले होते.
या सामन्याचे मैदानावरील पंच इयान गोल्ड, आलिम दर आणि तीसरे पंच रीचर्ड केटलबॉर्ग यांनी श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंदिमल याच्यावर आयसीसीच्या आचार संहिता 2.2.9 चा भंग केल्याचा आरोप लावला आहे.
या प्रकरणाची सुनावनी सोमवार दि. 18 जून रोजी सामना संपल्यानंतर सामना अधिकारी जवगाल श्रीनाथ यांच्यासमोर होणार आहे.
BREAKING: Sri Lanka captain Dinesh Chandimal has been charged for breaching Level 2.2.9 of the ICC Code of Conduct.
More to come… #WIvSL pic.twitter.com/EGU278hZug
— ICC (@ICC) June 17, 2018
या प्रकरणानंतर श्रीलंकन संघ व्यवस्थापन आणि श्रीलंकन क्रिकेट मंडळाने आमच्या खेळाडूंनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे म्हणत दिनेश चंदिमलची पाठराखण केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या श्रीलंकन क्रिकेट मंडळाच्या अडचणीत या प्रकरणामुळे आणखी भर पडली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–विंडिज विरुद्ध श्रीलंका कसोटीत रंगले नाट्य; श्रीलंका खेळाडूंचा खेळायला येण्यास नकार
–त्या व्हिडिओमुळे विराट कोहली-अनुष्का शर्मा अडचणीत