मागील महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ८ विकेट्सने न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने समालोचन केले होते. तर, अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा भारतीय संघाचा भाग होता. या सामन्यानंतर सध्या भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिकेच्या तयारीला लागण्यापूर्वी मिळालेल्या मोकळ्या वेळेत इंग्लंडमध्ये फिरण्याचा आनंद घेत आहे. दरम्यान, कार्तिक आणि जडेजा यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
दिनेश कार्तिक आणि रवींद्र जडेजा यांनी सोमवारी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून निवांत वेळ घालवत असलेले फोटो पोस्ट केलेला आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही कॉफी पितानाचे पोटो पोस्ट केला असूनही दोघांचे फोटो एकाच ठिकाणावरील वाटत नाहीत. हे फोटो पोस्ट करत या दोन्ही खेळाडूंनी छानपैकी कॅप्शन देखील लिहिले आहे.
दिनेश कार्तिकने फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की,’कधीही नसण्यापेक्षा लाते (Latte) उत्तम आहे.’
https://www.instagram.com/p/CQ8hMf9pOkZ/
त्याचबरोबर रविंद्र जडेजाने देखील फोटो पोस्ट करत कॅप्शन लिहिले की,’आजचा दिवस उत्तम जावा.’ त्यानंतर कॅप्शनच्या शेवटी जडेजाने कॉफीचे इमोजी टाकली आहे.
https://www.instagram.com/p/CQ8Uz9ts-ju/
इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेअगोदर भारतीय संघाला बायोबबल मधून तीन आठवड्यांचा ब्रेक दिला आहे. या ब्रेकनंतर 14 जुलैला भारतीय खेळाडू कसोटी मालिकेच्या तयारीसाठी एकत्र येतील. इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रविंद्र जडेजाच्या निवडीवर टीका करण्यात आली होती. कारण साउथम्प्टनच्या मैदानावरील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती आणि तरीही भारतीय संघाने अंतिम 11 जणांच्या संघामध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश केला होता.
अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी असे म्हटले होते की, भारतीय संघाने एक जास्तीचा वेगवान गोलंदाज संघामध्ये घेण्याऐवजी रवींद्र जडेजाला खेळवून चूक केली. रवींद्र जडेजाने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात फक्त एक गडी बाद केला आणि एकूण 31 धावा केल्या होत्या.
दिनेश कार्तिकने मागितली माफी
इंग्लंड आणि श्रीलंका विरुद्ध सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या मालिकेदरम्यान समालोचन करताना दिनेश कार्तिकने आपल्या सेक्सिस्ट कमेंटबद्दल माफी मागितली आहे. दिनेश कार्तिकने श्रीलंका आणि इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामना दरम्यान असभ्य विधान केले होते. दिनेश कार्तिकने क्रिकेट बॅटची तुलना शेजारच्या पत्नीशी केली होती. दिनेश कार्तिकने केलेले वक्तव्य चाहत्यांना अजिबात आवडले नव्हते.
यानंतर दिनेश कार्तिकने म्हटले होते की, ‘फलंदाजांना बॅट कधीच आवडत नाहीत. ते दोघेही एकमेकांचे हात पकडून पुढे चालत असतात. काही फलंदाजांना आपली बॅट आवडत नसते. त्यांना इतरांच्या बॅट खूप आवडतात. बॅट म्हणजे शेजारच्या पत्नीसारखी असते.’
दिनेश कार्तिकच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर दिनेश कार्तिकने तिसरा एकदिवसीय सामनादरम्यान सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला की, ‘मागच्या सामन्यादरम्यान जे काही झाले, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. मला खरोखरच तसे काही म्हणायचे नव्हतेे. पण ते वक्तव्य पूर्णपणे चुकीचे झाले. मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. माझे हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. मी खरोखरच माफी मागतो आणि अशी चूक पुन्हा माझ्याकडून होणार नाही. माझ्या आईने आणि पत्नीने माझ्या या वक्तव्यावर मला खूप ओरडले होते.’
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड-भारत कसोटी मालिकेत पुन्हा घुमणार प्रेक्षाकांचा आवाज, पंतप्रधानांची मोठी घोषणा
टोकियो ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात मेरी कोमसह ‘हा’ खेळाडू असेल भारतीय पथकाचा ध्वजधारक






