---Advertisement---

दिनेश कार्तिकची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, इमोशनल पोस्ट करून मानलं चाहत्यांचं आभार

---Advertisement---

टीम इंडियाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कार्तिकनं शनिवारी (1 जून) सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली. त्यानं एका भावनिक पोस्टद्वारे चाहते आणि प्रशिक्षकांचं आभार मानलं आहे. कार्तिक आज त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. तो आयपीएलमधून यापूर्वीच निवृत्त झाला आहे. या हंगामात त्यानं कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिकनं 22 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध आयपीएल 2024 मध्ये शेवटचा सामना खेळला. यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला होता. आयपीएलच्या या हंगामात कार्तिकनं 15 सामन्यात 187.35 च्या स्ट्राईक रेटनं 326 धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून दोन अर्धशतकं निघाली.

 

दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, तो आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीनंतर संयुक्तपणे सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. धोनीनं आयपीएलमध्ये 264 सामने खेळले आहेत. तर दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी 257 सामने खेळले आहेत.

कार्तिकनं आयपीएलच्या 257 सामन्यांमध्ये 4842 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत, तो आरसीबी व्यतिरिक्त दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. त्यानं 2013 मध्ये मुंबई इंडियन्ससोबत असताना आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.

दिनेश कार्तिक 2022 पासून एक मजबूत फिनिशर म्हणून उदयास आला होता. आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकनं 180 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं 330 धावा केल्या आणि टी20 विश्वचषकात स्थान मिळवलं होतं. आयपीएल 2024 मध्ये त्यानं 15 सामन्यांत 187.36 च्या स्ट्राईक रेटनं 326 धावा केल्या.

दिनेश कार्तिक भारतीय संघाकडून कसोटी, एकदिवसीय आणि टी20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्यानं टीम इंडियासाठी 26 कसोटी सामन्यांमध्ये 1025 धावा, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा आणि 60 टी20 सामन्यांमध्ये 686 धावा केल्या आहेत. त्यानं कसोटीमध्ये एकमेव शतक झळकावलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

सर्वांचा लाडका ‘डीके’ झाला 39 वर्षांचा! धोनीच्या सावलीत झाकोळली गेली अख्खी क्रिकेट कारकीर्द

आयपीएल चॅम्पियनच्या स्वागतासाठी जमलं संपूर्ण शहर! सेल्फी अन् हार घालण्यासाठी तुफान गर्दी; VIDEO VIRAL

बलात्काराचे आरोप, पंचांशी बाचाबाची अन् नो बॉल वाद! टी20 विश्वचषकात घडलेल्या सर्वात मोठ्या वादग्रस्त घटना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---