आयपीएल 2023 मध्ये सोमवारी एकमेव सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या दरम्यान खेळला गेला. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती. त्या खेळपट्टीवर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 126 धावा केल्या. संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक याच्याकडून या सामन्यात अपेक्षा असताना तो पुन्हा एकदा अपेक्षांवर खरा उतरण्यात अपयशी ठरला.
आरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संथ खेळपट्टी पाहून आरसीबीला फाफ डू प्लेसिस व विराट कोहली यांनी 9 षटकात 62 धावांची सलामी दिली. त्यानंतर मात्र इतर फलंदाज अपयशी ठरत गेले. संघाला चांगली फिनिश देण्याची जबाबदारी अनुभवी दिनेश कार्तिकवर होती. मात्र, तो 11 चेंडूवर 16 धावा करत धावबाद झाला.
मागील हंगामात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह आरसीबीसाठी फिनिशर ठरलेला कार्तिक या हंगामात पूर्णतः अपयशी ठरला आहे. त्याने हंगामात आत्तापर्यंत 9 सामन्यात 12.37 च्या सरासरीने 99 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 133 असा राहिला असून, सर्वोच्च धावसंख्या केवळ 28 राहिली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान तो दोन वेळा खाते ही खोलू शकला नाही.
.@RCBTweets: Bhaag DK 🏃
Yash Thakur: 🤷♂️🎯#IPLonJioCinema #LSGvRCB #TATAIPL #IPL2023 | @LucknowIPL pic.twitter.com/D4fyKHBts7
— JioCinema (@JioCinema) May 1, 2023
कार्तिक याने मागील वर्षी सर्वोत्तम फलंदाजी केली होती. आरसीबी ला प्ले ऑफपर्यंत पोहोचवण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या याच कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळालेली. त्यानंतर त्याने 2022 टी20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, त्यानंतर त्याला पुन्हा भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. (Dinesh Karthik Another Flop Inning In IPL 2023 Low Scroe Against Lucknow Supergiants)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गंभीरच्या खुन्नसला विराटचे प्रेमाने उत्तर! एकाच कृतीने जिंकले लखनऊच्या चाहत्यांचे मन, पाहा व्हिडिओ
लखनऊविरुद्ध विराट कोहलीची नकोशी कामगिरी, मोठा विक्रम करण्याची संधीही हुकली