दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना रद्द करण्यात आला. यामुळे पाच सामन्यांची टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत भारतीय संघाच्या अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या मालिकेच्या माध्यमातून भारतीय संघामध्ये दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने तीन वर्षानंतर पुनरागमन केले आहे. त्याने आपल्या प्रदर्शनातून सर्वांना प्रभवित केले आहे. त्याच्या चांगल्या प्रदर्शनाची पूर्व भारतीय खेळाडू आकाश चोप्राने याने कौतुक केले आहे.
चोप्राच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्तिकच्या मागून एमएस धोनीने पदार्पण करत तो निवृत्तही झाला असून, कार्तिक अजूनही छान खेळी करत आहे. तो भारतासाठी नक्कीच एक महत्वाचा खेळाडू ठरणार आहे.
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्येे त्याने इशान किशन (Ishan Kishan) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) दोघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेमध्ये भारताचे दोन सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे खेळाडू म्हणले आहे. तर कार्तिकला त्याने या मालिकेत चांगल्या प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूमध्ये तिसरे स्थान दिले आहे.
चोप्रा पुढे म्हणाला, “कार्तिक ज्या क्रमांकावर फलंदाजी करतो, तेथे फलंदाजी करणे सोपे नाही. त्याला त्या क्रमांकावर कशी फलंदाजी करायची हे चांगले माहित आहे. ते काम करणे इतके सोपे नाही. त्याची कारकीर्द खूप मोठी आहे. त्यामुळे त्याला तिथे कसे खेळायचे याचा अनुभव आहे. धोनीची पूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपली मात्र कार्तिक अजूनही खेळत असून तो एक धडाकेबाज कामगिरी करणारा खेळाडू आहे.”
कार्तिकच्या झटपट खेळीने त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात संघासाठी विजय आवश्यक असताना महत्वाची भुमिका पार पाडली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कार्लोस ब्रेथवेटने फलंदाजाला मारलेला चेंडू संघाला पडला महागात, गमवावा लागला सामना
दक्षिण आफ्रिका सीरिजनंतर टी-२० विश्वचषकासाठी भक्कम बनला भारतीय संघ, वाचा सविस्तर
बॅग पॅक करा आणि नव्या दौऱ्यावर निघा, ‘असे’ आहे टीम इंडियाचे पुढच्या ६ महिन्यांचे वेळापत्रक