सध्या भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. शिखर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, तो आणखी काही वर्ष तरी भारतीय संघासाठी खेळू शकतो. त्यामुळे धवन पुढील वर्षी होणारा वनडे विश्वचषक नक्की खेळेल असे मत, भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने व्यक्त केले आहे.
टी20 व कसोटी संघातून बाहेर असलेला धवन सध्या केवळ वनडे संघाचा भाग आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व देखील करत असतो. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक साजरे केले होते. त्याच्या याच कामगिरीनंतर बोलताना दिनेश कार्तिकने त्याचे कौतुक केले. कार्तिक म्हणाला,
“2023 च्या विश्वचषक स्पर्धेत तो निश्चितपणे भारतासाठी सुरुवात करेल. असे नसते तर तो तो आता संघाच्या आसपास नसता. तो 35 वयामध्ये आहे. त्याचा विचार नसता तर त्याला आत्ता मागे राहावे लागले असते. तो संघात आहे, यावरून असे दिसून येते की, संघ व्यवस्थापन त्याला वनडे संघात घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. तो आयसीसी स्पर्धांमधील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. 2019 च्या विश्वचषकातही त्याने दुखापत होण्यापूर्वी खरोखरच चांगली कामगिरी केली होती. तुम्ही त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकता.”
शिखर हा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत नेहमीच चमकदार कामगिरी करत आहे. दोन चॅम्पियन ट्रॉफी व दोन वनडे विश्वचषक खेळणाऱ्या धवनने या स्पर्धांमध्ये मिळून 6 शतके झळकावली आहेत. पुढील विश्वचषकात त्याला सलामीवीर म्हणून आपले स्थान नक्की करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, शुबमन गिल यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.
(Dinesh Karthik Backs Shikhar Dhawan As 2023 Opener)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद करा पण आमचा कुठं! ऋतुराज गायकवाडचा नाबाद द्विशतकी धमाका
वनडे विश्वचषक 2023साठी भारत, अफगाणिस्तानबरोबर ‘हे’ सहा संघ पात्र; दोन चॅम्पियन्स संघाना करावे लागणार श्रम