---Advertisement---

क्या बात हैं! दिनेश कार्तिकचा दिसला आक्रमक अंदाज, चौकार-षटकारांची केली बरसात, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 10:02 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा थरार उद्यापासून (९ एप्रिल ) रंगणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत ५ वेळेस आयपीएल विजेते मुंबई इंडियन्स आणि आपले पहिले पहिले जेतेपद मिळवण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघामध्ये रंगणार आहे. तसेच ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ देखील मैदानात कसून सराव करताना दिसून येत आहे.

अशातच कोलकता नाईट रायडर्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तुफानी फटकेबाजी करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील तिसरी लढत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी दोन्हीही संघ मैदानात घाम गाळताना दिसून येत आहे. दरम्यान, कोलकता नाईट रायडर्स संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये दिनेश कार्तिक चौफेर फटकेबाजी करताना दिसतोय.

कार्तिकने सराव सामन्यात फलंदाजी करताना अवघ्या ५० चेंडूत ९० धावांची खेळी केली आहे. यंदा तो चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/CNXdMwflbnl/

गतवर्षी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल २०२० स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची धुरा दिनेश कार्तिककडे होती. परंतु, स्पर्धेच्या मध्येच त्याने कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर ओएन मॉर्गनला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते.

यंदा या संघाकडून हरभजन सिंगसुद्धा खेळताना दिसणार आहे. अशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

आयपीएल २०२० स्पर्धेत वेस्ट इंडीज संघाचे स्टार खेळाडू आंद्रे रसल आणि सुनील नरेन यांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यासोबतच दिनेश कार्तिकला देखील संघासाठी धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे या संघाला प्ले ऑफ गाठण्यास देखील अपयश आले होते. अशातच येणाऱ्या हंगामात या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कौतुकाची थाप तर बनतेच! संंघाचं सोडा, धुंवाधार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा चेन्नईकडून सत्कार, हे पाहा फोटो

“सिंहासारख्या दृढ निश्चयाने करेल पुनरागमन”, श्रेयस अय्यरने शस्त्रक्रियनंतर दिली प्रतिक्रिया

आनंदाची बातमी! ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमधून परतला घरी; लिहिला ‘हा’ खास संदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---