रविवारी (३ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सनरायझर्स हैदराबाद संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. या डावात दिनेश कार्तिकने १८ धावा करत आयपीएल स्पर्धेतील मोठा कारनामा केला आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. या दरम्यान दिनेश कार्तिकने १२ चेंडूंमध्ये १८ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीसह त्याने आयपीएल कारकिर्दीत ४ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ११ व्या स्थानी पोहचला आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आहे,ज्याने ६२३५ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी शिखर धवन आहे,ज्याने ५६५९ धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावे ५५७१ धावांची नोंद आहे.
𝟜𝕂 𝕗𝕠𝕣 𝔻𝕂@DineshKarthik completes 4000 runs in the IPL. 🤩#KKRvSRH #KKR #AmiKKR #IPL2021 pic.twitter.com/tRpgMDTh1u
— KolkataKnightRiders (@KKRiders) October 3, 2021
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१) विराट कोहली -६२३५ धावा
२)शिखर धवन – ५६५९ धावा
३)रोहित शर्मा – ५५७१ धावा
४)सुरेश रैना – ५५२८ धावा
५)डेव्हिड वॉर्नर – ५४४९ धावा
६)एबी डिविलियर्स – ५१०६ धावा
७)ख्रिस गेल -४९६५ धावा
८) एमएस धोनी -४६९८ धावा
९)रॉबिन उथप्पा -४६०७ धावा
१०)गौतम गंभीर – ४२१७ धावा
११) दिनेश कार्तिक – ४०१३ धावा*
महत्त्वाच्या बातम्या –
Video: मिताली राजला धोनीकडून शिकायचंय हे कौशल्य, दिवस-रात्र कसोटीनंतर व्यक्त केली इच्छा
पुढील आयपीएल हंगामात आरसीबीचा कर्णधार बनणार कोण? माजी भारतीय क्रिकेटरने दिले ‘हे’ उत्तर
‘त्याची गती कमी झाली, पण…’, भुवनेश्वर कुमारबद्दल माजी भारतीय क्रिकेटरची मोठी प्रतिक्रिया