---Advertisement---

लईच चोपलं राव! दिल्लीविरुद्ध एकाच षटकात दिनेश कार्तिकने पाडला धावांचा पाऊस; ‘ऑरेंज कॅप’धारी बटलरलाही पछाडलं

On: रविवार, एप्रिल 17, 2022 12:39 AM
Dinesh-Karthik
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२२च्या २७व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १६ धावांनी विजय मिळवला. शनिवारी (दि. १६ एप्रिल) वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात बेंगलोरच्या खेळाडूंनी हंगामातील चौथा विजय काबीज केला. बेंगलोरच्या विजयाचा शिल्पकार दिनेश कार्तिक ठरला. विशेष म्हणजे, कार्तिकने यादरम्यान केलेल्या शानदार खेळीमुळे त्याने एक खास कारनामाही केला. अशी कामगिरी करणारा तो या हंगामातील संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant) नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) दिल्लीच्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने चोप द्यायला सुरुवात केली. कार्तिकने दिल्लीच्या एका गोलंदाजाविरुद्ध इतकी फटकेबाजी केली की, त्याने थेट कारनामाच केला. वयाच्या ३६व्या वर्षीही त्याने आपण काही कमी नाही, हे दाखवून दिले.

सामन्यादरम्यान झाले असे की, दिल्लीकडून १८वे षटक टाकण्यासाठी मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahman) आला होता. यावेळी स्ट्राईकवर दिनेश कार्तिक होता. त्याने मुस्तफिजूरच्या पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला. मुस्तफिजूरच्या पहिल्या तीन चेंडूवर कार्तिकने ३ चौकार मारले आणि त्यानंतरच्या दोन चेंडूंवर षटकार मारले. पुढे सहाव्या चेंडूवरही त्याने खणखणीत चौकार मारला. अशाप्रकारे कार्तिकने या षटकात ४ चौकार आणि २ षटकार मारत २८ धावा केल्या. यामुळे कार्तिकच्या नावावर एक खास विक्रम झाला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

कार्तिक आयपीएल २०२२मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा चोपणारा संयुक्तरीत्या दुसरा फलंदाज ठरला. या यादीत अव्वलस्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा पॅट कमिन्स आहे. कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर एकाच षटकात ३४ धावांची बरसात केली होती. त्यानंतर कार्तिकसोबत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी मुंबईचा डेवाल्ड ब्रेविस आहे. त्याने पंजाबच्या राहुल चाहरच्या गोलंदाजीवर एका षटकात २८ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आहे. त्याने मुंबईच्या बेसिल थंपीच्या गोलंदाजीवर २६ धावा कुटल्या होत्या.

दिनेश कार्तिकचा असाही कारनामा
यासोबतच दिनेश कार्तिक आयपीएल २०२२मध्ये अखेरच्या षटकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना तब्बल १४० धावा चोपल्या आहेत.

आयपीएल २०२२मध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
३४ धावा- पॅट कमिन्स (विरुद्ध डॅनियल सॅम्स, मुंबई इंडियन्स)
२८ धावा- दिनेश कार्तिक (विरुद्ध मुस्तफिजूर रहमान, दिल्ली कॅपिटल्स)
२८ धावा- डेवाल्ड ब्रेविस (विरुद्ध राहुल चाहर, पंजाब किंग्स)
२६ धावा- जोस बटलर (विरुद्ध बेसिल थंपी, मुंबई इंडियन्स)

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! तब्बल ४ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात बीसीसीआय करणार ‘या’ गोष्टीचे आयोजन

सलग सहाव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात? पाहा बाद फेरीसाठीचे पर्याय

रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---