कोरोना व्हायरसमुळे मागील दोन- अडीच वर्षांमध्ये क्रीडा विश्वाला चांगलाच फटका बसला होता. जगभरातील प्रसिद्ध आणि सर्वात मोठी असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगसारख्या टी२० लीगवरही याचा परिणाम झाला होता. त्यामुळे आयपीएलचे आयोजन परदेशात करण्यात आले होते. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आयपीएलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. तब्बल ४ वर्षांनंतर आयपीएल चाहत्यांना आयपीएलमध्ये कोणत्याही प्रकारची सेरेमनी (समारंभ) पाहायला मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयने एक निविदा जारी केली आहे. या हंगामातील क्लोजिंग सेरेमनी भव्य-दिव्य पद्धतीने करण्याची जोरदार तयारी केली आहे आणि त्यासाठी बीसीसीआयने लिलावाचे आयोजन केले आहे.
बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, यासाठी २५ एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यामध्ये सामील असलेल्या कंपन्या बीसीसीआयला मेलद्वारे कळवू शकतात. याशिवाय कंपन्यांना एक लाखाव्यतिरिक्त जीएसटी शुल्क भरावे लागेल जे, परत केले जाणार नाहीत.
यापूर्वी २०१८ साली झाली होती सेरेमनी
विशेष म्हणजे, तब्बल ४ वर्षांपूर्वी म्हणजेच, २०१८ साली आयपीएलमध्ये सेरेमनीचे (IPL Ceremony) आयोजन करण्यात आले होते. २०१९मध्ये पुलवामा हल्ल्याच्या शोकामुळे ही सेरेमनी टाळण्यात आली होती. त्यानंतर कोरोना व्हायरसने (Corona Virus) एन्ट्री केली आणि ही सेरेमनी पुन्हा एकदा टाळली गेली होती. मात्र, आता यावर्षीची सेरेमनी भव्य-दिव्य पद्धतीने करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
असे म्हणले जात आहे की, आयपीएलच्या या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल. तसेच, याच मैदानावर क्लोजिंग सेरेमनीचे (Closing Ceremony) आयोजनही केले जाईल. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाहीये. यावेळी ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले गेले नव्हते. त्यामुळे आता ४वर्षांनंतर होणाऱ्या या सेरेमनीला पाहण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन






