‘तो लहानपणीचा हिरो, त्याच्या ऍक्शनची कॉपी करण्याचाही केलेला प्रयत्न’, विराटच्या वॉर्नबद्दल भावना व्यक्त

'तो लहानपणीचा हिरो, त्याच्या ऍक्शनची कॉपी करण्याचाही केलेला प्रयत्न', विराटच्या वॉर्नबद्दल भावना व्यक्त

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे ४ मार्च २०२२ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या निधानानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाला मोठा झटला लागला होता. वॉर्नने क्रिकेटसाठी दिलेले योगदान हे अतुलनीय असल्यामुळे त्याच्या निधनाविषयी जवळपास प्रत्येक दिग्गजाने दुःख व्यक्त केले. आता भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी (१४ एप्रिल) त्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

विराट कोहली (Virat Kohli) सध्या त्याची आयपीएल फ्रेंचायझी आरसीबीच्या कॅम्पमध्ये आहे. माजी कर्णधार शुक्रवारी म्हणाला की, दिवंगत दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) त्याचा लहानपणीचा हिरो होता. तो म्हणाला की, ‘महान क्रिकेटपटूसोबतची प्रत्येक चर्चा ही एक शिकण्याचा अनुभव होता. तो माझ्या सहीत अनेक लोकांचा लहानपणीपासूनचा हिरो होता. तो एक काळचा प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि क्रिकेटर होता. त्याच्याविषयी जवळपास क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याला माहिती आहे.’

‘या खेळावर त्याचा एवढा प्रभाव आहे की, तुम्ही सर्वांनी कधी ना कधी वॉर्नच्या गोलंदाजी एक्शनचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तो एक अद्भुत व्यक्ती होता. मला त्याच्यासोबत मैदानाबाहेर चर्चा करण्याची खूप संधी मिळाली. तो नेहमी सकारात्मक चर्चा करत असायचा आणि त्याने केलेली कोणतीही चर्चा अशीच नसायची. ती नेहमी रचनात्मक असायची, असे काहीतरी असायचे, ज्यातून आपण शिकू शकत होतो. वॉर्न त्या सर्व आत्मविश्वासाने भरलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक होता, ज्यांना मी कधी भेटलो असेल,’ असेही विराटने पुढे बोलताना सांगितले.

दरम्यान, यावर्षी वॉर्न मार्च महिन्याच्या सुरुवातीला थायलंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. स्वतःच्या मालकीच्या विलामध्ये ४ मार्च रोजी अचानक तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी पूर्ण प्रयत्न केले, पण ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाजाचा जीव वाचू शकला नाही. वॉर्नच्या नावावर क्रिकेटचे असे अनेक विक्रम आहेत, जे आजही अबाधित आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

तेलही गेलं अन् तूपही! दीपक चाहरला गमवावे लागणार लिलावातील १४ कोटी, रिकामं हात परतावं लागणार घरी

IPL 2022| केकेआर पराभूत होऊनही आंद्रे रसलच्या नावावर अनोखा विक्रम, युसूफ पठाणला टाकलंय मागे

MI vs LSG| रोहितचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; मुंबईकडून ‘या’ खेळाडूचे पदार्पण, पाहा प्लेइंग इलेव्हन

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.