आयपीएल १५ मधील २६ वा सामना लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना लखनऊने १८ धावांनी जिंकला. हा त्यांचा हंगामातील चौथा विजय होता. लखनऊच्या या मोठ्या विजयाचा शिल्पकार राहिला कर्णधार केएल राहुल. त्याचा हा शंभरावा आयपीएल सामना होता, ज्यामध्ये त्याने शानदार शतक ठोकले आहे. या शतकानंतर त्याने केलेले सेलिब्रेशनही चर्चेत आहे.
राहुलने १९ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मुंबईच्या टायमल मिल्सला जबरदस्त चौकार खेचत आपले शतक पूर्ण (KL Rahul Century) केले आहे. ५६ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने शतकाला गवसणी घातली आहे. हे शतक त्याच्यासाठी विक्रमी ठरले आहे. या शानदार शतकी खेळीनंतर नेहमीप्रमाणे राहुलने आपले ट्रेडमार्क सेलिब्रेशनही (KL Rahul Celebration) केले.
शतक झळकावल्यानंतर त्याने हातातील बॅट वर करत मैदानाच्या चारही दिशांना फिरवली. त्यानंतर दोन्ही हाताची बोटे कानावर ठेवत त्याने शतकाचा जल्लोष (Shut Outside Noise Celebration) साजरा केला आहे. त्याच्या या जल्लोषाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
https://twitter.com/SlipDiving/status/1515297078036996096?s=20&t=QOrWZs4C23GUAnKmWSXbLg
काय आहे केएल राहुलच्या अनोख्या जल्लोषमागचे कारण?
राहुल बऱ्याचदा मोठ्या खेळी केल्यानंतर अशाप्रकारचे हटके सेलिब्रेशन करताना दिसला आहे. गतवर्षी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात शतक केल्यानंतरही त्याने असेच सेलिब्रेशन केले होते. त्यावेळी त्याने आपल्या या खास सेलिब्रेशनमागील कारणही सांगितले होते. “हे बाहेरील गोंधळाला बंद करण्यासाठी आहे. याद्वारे मी कोणाचा अनादर करत नाही. परंतु असे काही लोक असतात, जे तुम्हाला खाली खेचण्याचा आणि टीका करण्याचा प्रयत्न करतात. हे त्यांचा आवाज बंद करण्यासाठी आहे,” असे राहुल म्हणाला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
केएल राहुलने शतक ठोकत केले बरेच विक्रम
या सामन्यातील शतकी खेळीसह राहुलने बरेच विक्रमही केले आहे. तो १००व्या आयपीएल सामन्यात शतक करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. याबरोबरच राहुल आयपीएलमध्ये १ पेक्षा जास्त शतके करणारा दुसराच कर्णधार बनला आहे. हे त्याचे कर्णधार म्हणून आयपीएलमधील दुसरे शतक आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार असताना ५ शतके केली होती.
याखेरीज त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या विक्रमात संजू सॅमसनसोबत बरोबरी केली आहे. संजूनेही आजवर आयपीएलमध्ये ३ शतके केली आहेत. तसेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी ख्रिस गेलने सर्वाधिक ६, विराट कोहलीने ५, डेविड वॉर्नर व शेन वॉटसनने ४ शतके केली आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! तब्बल ४ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात बीसीसीआय करणार ‘या’ गोष्टीचे आयोजन
सलग सहाव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात? पाहा बाद फेरीसाठीचे पर्याय
डिविलियर्स सोबतच्या नात्याबद्दल ‘बेबी एबी’ ब्रेविसने केला खुलासा; म्हणाला, ‘खूप खास नाते आहे’