---Advertisement---

पहिला आणि एकमेव! दिनेशचा फायनलमध्ये शतकी धमाका, विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले नाव

Dinesh-Karthik
---Advertisement---

तमिळनाडू विरुद्ध हिमाचल प्रदेश (Tamilnadu vs Himachal Pradesh) यांच्यात विजय हजारे ट्रॉफी २०२१ चा (Vijay Hazare Trophy 2021) अंतिम सामना (Vijay Hazare Trophy Final) झाला. जयपूर येथे झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तमिळनाडूने ३१४ धावा केल्या. तमिळनाडूला या डोंगराएवढ्या धावा उभारून देण्यात भारताचा अनुभवी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याचा मोठा वाटा राहिला. त्याने या महत्त्वपूर्ण सामन्यात खणखणीत शतक ठोकत (Century In Vijay Hazare Trophy Final) मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या तमिळनाडूला चांगली सुरुवात मिळाली नव्हती. अवघ्या ३४ धावांवर त्यांच्या ३ महत्त्वपूर्ण विकेट्स गेल्या. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकावर कार्तिक फलंदाजीला आला होता. मात्र संघाच्या परिस्थितीचा त्याच्यावर कसलाही परिणाम जाणवला नाही. त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौफेर फटकेबाजी करायला सुरुवात केली. पुढे हीच खेळी सुरु ठेवत त्याने १०३ चेंडूंचा सामना करताना ७ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ११६ धावा चोपल्या. ११२ च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या.

त्याच्या या शतकी योगदानामुळे तमिळनाडू संघाला ३०० पेक्षा जास्त धावांपर्यंत मजल मारता आली. या शतकासह कार्तिक विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात २ शतके करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू (First And Only Cricketer) बनला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये बंगालविरुद्ध अंतिम सामना खेळताना त्याने ११२ धावांची शानदार खेळी केली होती.

हेही वाचा- Vijay Hazare Trophy: हिमाचल प्रदेशला पहिले जेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी, फायनलमध्ये तमिळनाडूशी करणार दोन हात

याव्यतिरिक्त विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. हे त्याचे या स्पर्धेतील नववे शतक होते. याबाबतीत अभिनव मुकुंद, अंकित बावने त्याच्यासोबत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर यशपाल सिंग १० शतकांसह दुसऱ्या स्थानी आणि रॉबिन उथप्पा सर्वाधिक ११ शतकांसह पहिल्या स्थानी आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
११- रॉबिन उथप्पा
१०- यशपाल सिंग
०९- अभिनव मुकुंद अंकित बावने, दिनेश कार्तिक*
०८- ऋतुराज गायकवाड, शेल्डन जॅक्सन

महत्त्वाच्या बातम्या-

वनडेत कोहली, टी२०त आझम अन् कसोटीत रूट; धावांच्या ‘मोठ्या’ विक्रमांत हे कर्णधारच राहिलेत नंबर १

‘अंतर्गत संभाषण मीडियासमोर आणणार नाही’, भारताच्या नेतृत्त्वबदलाबाबत राहुल द्रविडचे मोठे भाष्य

एकीचे बळ! जेव्हा हरभजनवर आलेली बंदी, तेव्हा भारतीय संघाने दाखवलेला खंबीर पाठींबा, वाचा तो किस्सा

हेही पाहा- 

करिअरच्या लास्ट बॉलवर फलंदाजांना त्रिफळाचित करणारे गोलंदाज । 5 Legends take Wicket on Last Ball

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---