आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 172 धावा केल्या.
या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यानंतर अंपायर्सच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हे प्रकरण बंगळुरूचा फलंदाज दिनेश कार्तिकशी संबंधित आहे. त्याच्याविरुद्ध तिसऱ्या पंचांनी कोणतीही स्पष्ट तपासणी न करता एलबीडब्ल्यूच्या अपीलवर निर्णय दिला. या चुकीच्या निर्णयामुळे आयपीएलमधील खराब अंपायरिंग पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील 15व्या षटकाची आहे. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेश खाननं रजत पाटीदारला 34 धावांवर बाद केलं. यानंतर क्रिजवर आलेल्या दिनेश कार्तिकनं पहिला चेंडू खेळला, जो त्याच्या पॅडला लागला. आवेशनं अपील केल्यानंतर अंपायरनं आऊट दिलं. दिनेश कार्तिकनं यावर डीआरएस रिव्ह्यू घेतला.
अनिल चौधरी हे या सामन्यासाठी थर्ड अंपायरच्या सीटवर बसले होते. एलबीडब्ल्यूसाठी बॉल ट्रॅकिंग सिस्टम वापरण्यापूर्वी अल्ट्रा-एजचा वापर केला गेला. यामध्ये चेंडू पॅडला लागण्यापूर्वीच अल्ट्रा-एजमध्ये एक प्रचंड स्पाइक दिसत होता. हा स्पाइक पाहून थर्ड अंपायरनं मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला आणि कार्तिकला नाबाद घोषित केलं.
मात्र पुन्हा रिप्ले पाहिल्यावर दिसून आलं की, चेंडू बॅटला लागलाच नव्हता. कार्तिकची बॅट पॅडला लागल्यामुळे अल्ट्रा-एजमध्ये स्पाइक दिसला होता. यानंतर समालोचकही खराब अंपायरिंग बद्दल बोलताना दिसले. या घटनेची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते दावा करत आहेत की, बंगळुरू-राजस्थान सामन्यात फिक्सिंग झालं होतं.
Umpire decision of giving Not Out to Dinesh Karthik is gonna be matter of discussion 😕 #RCBvsRR pic.twitter.com/CzWHz94ED8
— Vivek Kumar(सनातनी 🙏🏻🚩) (@Vivek7324) May 22, 2024
डावाच्या 15व्या षटकात दिनेश कार्तिकला जीवदान मिळालं, मात्र त्याला याचा फायदा घेता आला नाही. तो 13 चेंडूत केवळ 1१ धावा करून बाद झाला. आपल्या या संथ खेळीत त्यानं केवळ एक चौकार मारला. आवेश खानच्या 19व्या षटकात कार्तिक यशस्वी जयस्वालच्या हाती झेलबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
रोव्हमन पॉवेलचा हा झेल पाहून मैदानावरील सर्वच थक्क! कोणाचाच विश्वास बसेना; पाहा VIDEO
जे कोणीही करू शकलं नाही ते विराटनं करून दाखवलं! राजस्थानविरुद्ध लवकर आऊट होऊनही रचला इतिहास
एलिमिनेटर सामन्यात आरसीबी टॉस हारली, राजस्थानची गोलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11