---Advertisement---

नादच खुळा! टी२० क्रमवारीत दिनेश कार्तिकची चक्क १०८ स्थानांनी भरारी, इशानचाही टॉप-१०मध्ये ताबा

On: गुरूवार, जून 23, 2022 10:59 AM
Ishan-Kishan-Dinesh-Karthik
---Advertisement---

बुधवारी (२२ जून) आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला त्याच्या शानदार प्रदर्शनाचा फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. कार्तिकने फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत तब्बल १०८ स्थानांनी उडी घेतली आहे. तसेच सलामीवीर इशान किशन याने देखील पहिल्या १० जणांमध्ये जागा मिळवली आहे. 

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत कार्तिक (Dinesh Karthik) आणि इशानने (Ishan Kishan) जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले होते. इशानने या मालिकेत सलामीवीराची भूमिका बजावत ५ सामन्यात २०६ धावा केल्या होत्या. ज्याचा फायदा त्याला टी२० क्रमवारीत झाला आहे. इशानने फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत एका स्थानाची प्रगती केली असून तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तो पहिल्या १० फलंदाजांमध्ये असणारा एकमेव भारतीय आहे. तसेच हे त्याचे आजवरच्या टी२० कारकिर्दीत टी२० क्रमवारीत (ICC T20 Ranking) मिळवलेले सर्वोत्तम स्थान आहे.

याशिवाय फिनिशर कार्तिकनेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९२ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५५ धावांच्या झटपट खेळीचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे फळ त्याला टी२० क्रमवारीत मिळाले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने चक्क १०८ स्थानांनी उडी घेतली असून तो ८७ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर अव्वलस्थानी अजूनही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा दबदबा आहे. त्याच्या खात्यात सर्वाधिक ८१८ गुण आहेत.

युझवेंद्र चहलची मोठी उडी
गोलंदाजांच्या टी२० क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी२० सामन्यात ६ विकेट्स घेत त्याला ३ स्थानांचा फायदा झाला आहे. चहल गोलंदाजांच्या टी२० क्रमवारीत २३व्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड ७९२ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान (चौथ्या स्थानी) आणि श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगा (सहाव्या स्थानी) यांनीही प्रत्येकी एका स्थानाची प्रगती केली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता! सराव सामन्यात भारताविरुद्ध खेळणार बुमराहसह ‘हे’ ४ क्रिकेटर, पाहा कसे आहेत संघ

तब्बल १०८ शतके ठोकणाऱ्या ‘आशियाई ब्रॅडमन’ची प्रकृती नाजूक, आयसीयूमध्ये आहेत भरती

संघात घेतलं नाही म्हणून क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वतःची नस कापली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---