---Advertisement---

काय सांगता! सराव सामन्यात भारताविरुद्ध खेळणार बुमराहसह ‘हे’ ४ क्रिकेटर, पाहा कसे आहेत संघ

On: गुरूवार, जून 23, 2022 10:14 AM
Virat-Kohli-Jasprit-Bumrah
---Advertisement---

भारत क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघांमध्ये पुनर्निधारित कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. १ जुलैपासून ऍजबस्टन येथे इंग्लंड आणि भारत यांच्यात राहिलेला पाचवा व अखेरचा कसोटी सामना रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ लिसेस्टरशायर संघाविरुद्ध ४ दिवसीय सराव सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी दोन्हीही संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

२३ जून ते २६ जूनदरम्यान लिसेस्टरच्या मैदानावर होणाऱ्या सराव सामन्यासाठी (Warm Up Test Match) भारतीय संघाने (Team India) नवी योजना आखली आहे. या सामन्याद्वारे भारतीय संघातील सर्व खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळाली म्हणून काही खेळाडूंनी विरोधी संघात पाठवण्यात आले आहे.

त्यामुळे या लिसेस्टरशायर विरुद्ध भारत (Leicestershire vs India) संघातील सराव सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना दिसतील. तसेच कसोटीपटू चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हा देखील भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरेल. बुमराह आणि पुजाराव्यतिरिक्त यष्टीरक्षक रिषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णा हेदेखील लिसेस्टरशायर संघाचा भाग असतील.

लिसेस्टरशायर क्लबद्वारे जाहीर अहवालात असे लिहिले गेले आहे की, “एलसीसीसी, बीसीसीआय आणि ईसीबी या सर्वांनी सराव शिबीरासाठी ४ भारतीय खेळाडूंना रनिंग फॉक्स संघाचा भाग बनण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरून इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या सर्व भारतीय खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळेल. याबरोबरच सराव सामन्यात ११ नव्हे तर १३ खेळाडूंचा संघ खेळणार आहे. जेणेकरून अधिक लवचिकता प्रदान करता येईल आणि गोलंदाजीचा वर्कलोड व्यवस्थापित करण्यात मदत होईल.”

https://twitter.com/leicsccc/status/1539643464790540289?s=20&t=kVp3YjfUF0JQnoXp5ragOg

 

सराव सामन्यासाठी असे आहेत संघ-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव

लिसेस्टरशायर सीसीसी: सॅम इवांस (कर्णधार), रेहान अहमद, सॅम बेट्स (यष्टीरक्षक), नेट बॉली, विल डेविस, जॉय एविसन, लुइस किम्बर, अबी सकांडे, रोमन वॉकर, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

तब्बल १०८ शतके ठोकणाऱ्या ‘आशियाई ब्रॅडमन’ची प्रकृती नाजूक, आयसीयूमध्ये आहेत भरती

आजच्याच दिवशी ९ वर्षांपुर्वी ‘धोनी आणि कंपनी’ने रचला होता इतिहास, बनला होता एकमेवाद्वितीय कर्णधार

महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---