---Advertisement---

“आम्ही अजूनही उत्कृष्ट खेळ…”, राजस्थान विरुद्धच्या विजयानंतर दिनेश कार्तिकने दिली प्रतिक्रिया

On: गुरूवार, ऑक्टोबर 1, 2020 4:55 PM
---Advertisement---

आयपीएल 2020 च्या 12 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला. या हंगामात केकेआरने आपला दुसरा विजय नोंदविला आहे.

केकेआरकडून वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि कमलेश नागरकोटीने शानदार गोलंदाजी केली. दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. खेळाडूंनी खेळात सुधारणा पुन्हा सुधारणा करायला हवी, असे मत केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक याने व्यक्त केले आहे.

सुधारणा करण्याची आवश्यकता

सामन्यानंतर बोलताना कार्तिक म्हणाला, “आम्ही अजूनही उत्कृष्ट खेळ दाखविला नाही. आम्हाला बर्‍याच क्षेत्रात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. युवा फलंदाज शुबमन गिल, वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि जोफ्रा आर्चर यांनी खरोखर चांगले प्रदर्शन केले. आम्ही क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली. युवा क्षेत्ररक्षकांनी चांगले झेल घेतले.”

राणा आणि गिल यांनी केली भागीदारी

राजस्थानने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. केकेआर संघाचा सलामीवीर सुनील नरेन चौथ्या षटकात 14 चेंडूत 15 धावांची संथ खेळी खेळल्यानंतर बाद झाला. तथापि, युवा गिल आणि नितीश राणा यांनी डाव सांभाळला आणि संघाची धावसंख्या 80 च्या पलीकडे नेली

सलामीवीर फलंदाज गिल आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला नितीश राणा यांनी दुसर्‍या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र त्यानंतर राहुल तेवतियाने नितीश राणाला झेलबाद केले. राणानंतर गिलही आर्चरच्या चेंडूवर 47 धावा काढून तंबूत परतला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या आंद्रे रसलने काही मोठे फटके खेळले पण अंकित राजपूतने त्याला 24 धावांवर बाद केले.

मॉर्गनने केली चांगली कामगिरी

शेवटी, अनुभवी फलंदाज ऑएन मॉर्गनने आपली क्षमता दाखवत मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची कामगिरी पार पडली. या सामन्यात केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावून 174 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून राजस्थान संघ केवळ 137 धावाच करु शकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---