आयपीएल 2023चा 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. दोन पराभवानंतर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरसीबीला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. निर्धारित 20 षटकात आरसीबीचे फलंदाज 174 धावा करू शकले. या डावात आरसीबीचा अनुभवी फलंदाज दिनेश कार्तिक हा खाते खोलण्यात अपयशी ठरला. यासोबतच त्याच्या नावे आयपीएल इतिहासातील एक नकोसा विक्रम जमा झाला.
मागील हंगाम आपल्या आक्रमक फलंदाजीने गाजवलेल्या कार्तिककडून या हंगामात देखील आरसीबीला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो हंगामातील पहिल्या चारही सामन्यात पूर्णतः अपयशी ठरला आहे. मुंबईविरुद्ध पहिल्या सामन्यात तो पहिल्या चेंडूवर बाद झालेला. दुसऱ्या सामन्यात एका धावेवर तो नाबाद राहिलेला. तिसऱ्या सामन्यात आठ धावा करण्यात त्याला यश आलेले. या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याच्याकडून योग्य फिनिश येणे अपेक्षित होते. मात्र, कुलदीप यादवने पहिल्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
शून्यावर बाद होताच कार्तिक हा आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा संयुक्तरीत्या पहिला फलंदाज ठरला. आयपीएल कारकिर्दीत कार्तिक मनदीप सिंगसह प्रत्येकी 15 वेळा शून्यावर बाद झाला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व केकेआरचा सुनील नरीन हे प्रत्येकी 14 वेळा आयपीएलमध्ये खाते खोलू शकले नाहीत.
सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरीस असलेला कार्तिक मागील वर्षी दमदार फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने संघासाठी फिनिशरची भूमिका योग्यरीत्या पार पाडलेली. त्यानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन देखील झालेले. मात्र, टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर त्याला भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.
(Dinesh Karthik Out On Duck Most Times In IPL History With Mandeep Singh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर बुमराह-श्रेयसच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिले अपडेट, अशी आहे पुढील रणनीती
RCB vs DC । दिल्ली कॅपिटल्सने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन