इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाने विशिष्ट कामगिरी केली नव्हती. त्यामुळे संघाला गुणतालिकेत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलचा हा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या हंगामादरम्यान केकेआर संघाचे नेतृत्व दिनेश कार्तिक करत होता. परंतु अर्ध्यातच त्याने कर्णधारपद सोडले होते आणि इयोन मॉर्गनला नवा कर्णधार नियुक्त करण्यात आले होते.
परंतु कार्तिकने संघाचे नेतृत्त्वपद सोडण्यापुर्वी केकेआरच्या संघाने 7 सामने खेळले होते. त्या 7 सामन्यांपैकी 4 सामन्यात केकेआर संघाला विजय मिळाला होता, तर 3 सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. याच आधारावर केकेआर संघाने गुणतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर होता. पण पुढे त्यांची घरसण झाली होती.
गौरव कपूरसोबत एका विशेष कार्यक्रमात बोलताना कार्तिक म्हणाला की, “मला आणि मॉर्गनला केकेआरच्या कर्णधारपदातील बदलांबद्दल पुर्वीपासूनच माहित होते. मला वाटते की, केकेआरला बरेच श्रेय दिले पाहिजे, कारण त्यांनी ते खूप छान पद्धतीने सर्वकाही सांभाळले होते. त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली. त्यावेळी केकेआरसाठी इतर कोणी नसून मी एकटाच सर्वात मोठी समस्या होतो. पण मला नेतृत्त्वपदावरुन काढण्याच्या निर्णयामुळे मॉर्गन नाखूष होता. पण मॉर्गन संघाच्या नेतृत्त्वपदासाठी योग्य व्यक्ती आहे.”
त्याचबरोबर कार्तिक पुढे म्हणाला की, “मॉर्गन जो इंग्लंडचा कर्णधार होता, त्याच्यासाठी ही खूप दबावाची गोष्ट होती. त्याला आयपीएल खेळायचे होते आणि त्याचा आनंद घ्यायचा होता. त्याचा तो पूर्णपणे उपभोग घेत होता. यापूर्वी तो उपकर्णधार होता. त्याचबरोबर तो मला नेहमी मदतही करत होता.” परंतु इंग्लंडच्या संघाप्रमाणे आयपीएलमध्ये मॉर्गन उत्कृष्ट कामगिरी करू शकला नाही. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात तो कर्णधार म्हणून खास कामगिरी करू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
खुन्नस! गांगुली ९९ धावांवर बाद झाल्याचे ऐकताच बाथरुममधून पळत आला ‘हा’ दिग्गज, सुनावली खरीखोटी
टी२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने; आयसीसीकडून संघांची गटवारी जाहीर