जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. तत्पूर्वी, सर्व संघ तयारीला देखील लागले आहेत. आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने आपल्या काही प्रमुख खेळाडूंचे पॉडकास्ट रिलीज केले आहेत. संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याने या पॉडकास्टमध्ये आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीचे काही दिवस आठवले आहेत.
आरसीबीने रिलीज केलेल्या पॉडकास्टमध्ये कार्तिक याने आपल्या सुरुवातीच्या काळातील काही गोष्टी सांगितल्या. स्वतःच्या आणि धोनीच्या होणाऱ्या तुलनेबद्दल बोलताना त्याने अतिशय उत्कृष्ट उत्तर दिले. तो म्हणाला,
“आम्ही दोघांनी एकत्रच कारकिर्दीची सुरुवात केली. त्याच्या आधी मी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर त्याचा भारत ए दौरा चांगला गेला. त्याला संधी मिळाली आणि त्याने प्रत्येक संधीचे सोने केले. तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि फलंदाज बनला.”
कार्तिकने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात सप्टेंबर 2004 मध्ये तर धोनीने डिसेंबर 2004 मध्ये केली. पुढे धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्या नेतृत्वात भारताने सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली. त्यानंतर धोनीने आपल्या यशस्वी कारकीर्दीला 2020 मध्ये निवृत्ती घेत पूर्णविराम दिला.
दुसऱ्या बाजूने कार्तिकचा विचार करायचा झाल्यास त्याला भारतीय संघात वारंवार संधी मिळाली नाही. मात्र, मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. वयाच्या 35 नंतर त्याचा खेळ अधिक बहरल्याचे दिसले. 2019 वनडे विश्वचषकानंतर त्याने थेट मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. टी20 संघात तो फिनिशर भूमिका बजावताना दिसला. मात्र, टी20 विश्वचषकातील भारतीय संघाच्या पराभवानंतर तो पुन्हा संघात दिसला नाही.
(Dinesh Karthik Said Me And Dhoni Start Career Together But He Success More)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी खेळाडूच्या वयामुळे पेटला नवीन वाद, ‘तुम्हीच सांगा कोणत्या एँगलने 16 वर्षांचा दिसतो हा खेळाडू’
‘या’ खेळाडूला दुर्लक्षित करून ऑस्ट्रेलियाने केली मोठी चूक, भारतीय दिग्गजाचा खुलासा