---Advertisement---

‘मला हजारो लोकांनी नको नको त्या शिव्या दिल्या’; समालोचक दिनेश कार्तिकने मांडली व्यथा

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 12:45 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या नव्या भूमिकेत दमदार फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याने भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडमधील साउथम्पटन येथे झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याद्वारे समालोचन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्या या नव्या इंनिगसाठी सर्वांनी त्याला शुभेच्छा देत असताना त्याचे कौतुकही केले होते. परंतु दरम्यान त्याला बऱ्याचशा गोष्टींचा सामनाही करावा लागला असल्याचे त्याने सांगितले आहे.

गौरव कपूरच्या ‘२२ यार्ड्स पॉडकास्ट’मध्ये बोलताना कार्तिकने समालोचन करताना आपल्याला आलेले अनुभव सांगितले आहेत. तो म्हणाला की, “माझा समालोचक म्हणून पहिला दिवस खूप चांगला राहिला. अनेकांनी माझे तोंडभरुन कौतुक केले. अगदी पहिल्या दिवसाप्रमाणे दुसरा दिवसही खूप चांगला होता. मात्र तिसऱ्या दिवशी लोकांनी मला शिव्या देण्यास सुरुवात केली.”

लोकांनी मला घाणेरड्या शिव्या दिल्या
“मी एक-दोन दिवस साउथम्पटनमधील हवामानाची माहिती दिली होती. पण लोकांनी या गोष्टीला खूपच गांभीर्याने घेतले. तू लवकर उठ, एवढा वेळ तू काय करत आहेस, असे अनेकांनी मला ऐकवले. माझ्या बोलण्याने साउथम्पटनमध्ये पाऊस पडत आहे, असे सांगत काहींना मला शिवीगाळ केली. काहींनी तर खूप घाणेरड्या शब्दांचा वापर केला, जे मी इथे सांगू शकत नाही. मी उशीरा उठल्यामुळे इतके बोलणे ऐकावे लागणे खरच खूप दुर्दैवी होते. खरच मला उशीरापर्यंत झोपायचे होते. मी दररोज केवळ हवामानाची माहिती देण्यासाठी सकाळी ६ वाजता उठू शकत नाही,” असेही त्याने सांगितले.

कार्तिकव्यतिरिक्त माजी भारतीय कसोटीपटू सुनिल गावसकर हेसुद्धा कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या समालोचक पॅनेलचा भाग होते. हे दोनीही भारतीय दिग्गज इंग्रंजी भाषेतील समालोचकाच्या भूमिकेत होते. त्यानंतर कार्तिक इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील क्रिकेट मालिकेतही समालोचन करताना दिसला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

SLvIND: पडीक्कलच्या फॉर्मने वाढवली टीम इंडियाची चिंता, सैनीच्या गोलंदाजीवर दिसला संघर्ष करताना

गिलच्या पर्यायी खेळाडूवरुन कोहली-निवडकर्ते आमनेसामने, बीसीसीआय अध्यक्षाची आली प्रतिक्रिया

आयसीसीने उचलले मोठे पाऊल, ‘या’ कारणामुळे मनु साहनींची सीईओ पदावरुन हकालपट्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---