---Advertisement---

आयसीसीने उचलले मोठे पाऊल, ‘या’ कारणामुळे मनु साहनींची सीईओ पदावरुन हकालपट्टी

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 10:47 AM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मनु साहनी यांच्याविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. आयसीसीने साहनीला तातडीने पद सोडायला सांगितले आहे. साहनीने पदावरून राजीनामा दिल्यानंतर जियोफ अलार्डिसला आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद देण्यात आले आहे.

आयसीसीने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, ‘मुख्य कार्यकारी मनु साहनी तत्काळ प्रभावाने त्यांचे पद सोडत आहेत. तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिओफ अलार्डिस हे कार्यभार स्वीकारणार आहेत.’ साहनी यांना आपल्या साथीदारांना कठोर वागणुक दिल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. आचरण ऑडिट कंपनी पीडब्ल्यूसी अंतर्गत चौकशी करतेवेळी त्यांना मार्च महिन्यातच रजेवर पाठवण्यात आले होते.

साहनी यांनी विश्व संस्थेने अर्थात आयसीसीने त्यांच्या विरुद्ध केलेल्या चौकशीला पूर्वनियोजित कट असल्याचे म्हटले होते. 2019 मध्ये आयसीसी विश्वचषकानंतर ते डेव्ह रिचर्डसनच्या जागी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले होते. त्यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपणार आहे.

मागच्याच महिन्यात साहनी यांनी आयसीसीवर केले होते आरोप
खरे तर मागच्या महिन्यात 21 तारखेला साहनी यांनी आयसीसीबद्दल मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत फेटाळून लावले होते. इतकेच नव्हे तर हे सर्व आरोप माझ्यावर करण्याचा त्यांनी कट रचला असल्याचाही दावा केला होता.

गैरवर्तनाच्या आरोपामुळे निलंबित झालेल्या सीईओ मनु साहनी यांनी निवेदनात म्हटले आहे की, “मला माहिती आहे की हा सर्व पूर्वसूचित कट आहे आणि त्याचा मी शिकार झालो आहे. निष्पक्ष प्रक्रिया सुरू करण्याचा किंवा मला माझी बाजू मांडण्याची संधी दिली असल्याचे सर्व दावे खोटे आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या-

दुःखद बातमी! महाराष्ट्राचे माजी अष्टपैलू कालवश, हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

फक्त ४ वनडेचा अनुभव असणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाने पहिल्या ३ चेंडूत काढल्या २ विकेट्स, पाहा ते क्षण

इंग्लंडच्या नव्या संघाने पाकिस्तानला चारली धूळ, पहिल्या वनडेत पाहुण्यांचा ९ विकेट्सने दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---