---Advertisement---

दुःखद बातमी! महाराष्ट्राचे माजी अष्टपैलू कालवश, हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 10:15 AM
Cricket Ground
---Advertisement---

महाराष्ट्राचे माजी अष्टपैलू खेळाडू रमेश बोर्डे यांचे गुरुवारी (०८ जुलै) निधन झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. रमेश बोर्डे हे भारताचे माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचे लहान बंधू होते. त्यांच्या परिवारात एक मुलगी आणि एक मुलगा आहे. रमेश बोर्डे यांच्या निधनाची बातमी भाऊ चंदू बोर्डे यांनी दिली आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने रमेश यांचे निधन झाले आहे. गुरुवारी पहाटे त्यांनी पुणे येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला असल्याचे, चंदू यांनी सांगितले.

आपल्या बंधूच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना चंदू म्हणाले की, “रमेश हे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते. ते उजव्या हाताचे फलंदाज होते. त्याच बरोबर ते फिरकीपटू गोलंदाजीही करत असत. त्यांचे व्यक्तिमत्व मृदुभाषी होते.”

रमेश बोर्डे यांनी साल 1973-74 मध्ये विदर्भाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. रमेश यांनी आपल्या मोठ्या भावाच्या नेतृत्वाखाली पहिला सामना खेळला होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण 42 प्रथम श्रेणी सामन्यात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान एकूण 1326 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 2 शतकांचा समावेश होता. याच बरोबर 124 धावा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावा होत्या. त्यांनी एकूण 42 विकेटदेखील घेतल्या होत्या. रमेश हे मधल्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मैदानावर उतरत होते.

1970 च्या उत्तरार्धात आणि 1980 च्या दशकाच्या सुरुवातीस रमेश यांनी दुलीप करंडकातील स्टार-स्टॅंड वेस्ट झोन लाइन अपमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याचबरोबर 1983-84 मध्ये पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करताना रमेश यांनी वेस्ट इंडिजच्या रिच रिचर्डसन आणि लॅरी गोम्स यांना बाद करण्याचा पराक्रम केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त ४ वनडेचा अनुभव असणाऱ्या इंग्लिश गोलंदाजाने पहिल्या ३ चेंडूत काढल्या २ विकेट्स, पाहा ते क्षण

इंग्लंडच्या नव्या संघाने पाकिस्तानला चारली धूळ, पहिल्या वनडेत पाहुण्यांचा ९ विकेट्सने दारुण पराभव

संजू सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकाने श्रीलंकाविरुद्ध करावे यष्टीरक्षण, माजी खेळाडूची इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---