इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी लिलाव झाला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात अनेक स्टार खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच लढत पाहायला मिळाली. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या संघांमध्ये मोठी बोली पाहायला मिळाली.
कार्तिक झाला करोडपती
या मेगा लिलावात यष्टीरक्षक फलंदाजांना चांगली मागणी पाहायला मिळाली. ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला, तर निकोलस पूरन व जॉनी बेअरस्टो या विदेशी यष्टिरक्षकांना देखील चांगली बोली लागली. दिनेश कार्तिक याच्यासाठी दक्षिण भारतातील चेन्नई सुपर किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांनी अखेरपर्यंत लढत दिली. कार्तिकचे गृहराज्य असलेल्या तमिळनाडूतील चेन्नईने त्याच्यासाठी चांगलाच जोर लावला. मात्र, अखेरीस बेंगलोरने ५ कोटी ५० लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्याकडे ओढले. २०१५ नंतर कार्तिक पुन्हा एकदा बेंगलोरसाठी खेळतांना दिसणार आहे. संघाचा कर्णधार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-