---Advertisement---

इशान १५.२५ कोटींना जाऊनही आयपीएल इतिहासातील चौथा महागडा खेळाडू, मग पहिले तिघे कोण? वाचा

On: शनिवार, फेब्रुवारी 12, 2022 5:12 PM
ishan kishan
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा मेगा लिलाव १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे झाला. या लिलावात बऱ्याच अनपेक्षित बोली पाहायला मिळाल्या. त्यातही भारताचा युवा यष्टीरक्षक इशान किशन याने तर सर्वच रेकॉर्ड मोडले. त्याला विकत घेण्यासाठी त्याची जुनी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. अखेर मुंबईने त्याला विक्रमी १५.२५ कोटींची बोली लावत पुन्हा आपल्या संघात विकत घेतले आहे. यासह इशान आयपीएल इतिहासातील चौथा सर्वात महागडा खेळाडू (Fourth Most Expensive Player) ठरला आहे.

सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन संघात इशान किशनसाठी चांगलीच स्पर्धा झाली. १५ कोटींपर्यंत त्याची किंमत गेल्यानंतरही हे दोन्ही संघ माघार घेण्यास तयार नव्हते. मात्र, अखेर मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटींच्या बोलीसह त्याला आपल्या ताफ्यात पुन्हा सामील करून घेतले.

इशान गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सचाच भाग होता. मात्र, या लिलावापूर्वी संघाने त्याला मुक्त केले होते. त्यामुळे तो लिलावात सहभागी झाला होता. पण या लिलावातून मुंबईने आपला खेळाडू पुन्हा संघात परत घेतला आहे. विशेष गोष्ट अशी की मुंबईने इतिहासात पहिल्यांदाच लिलावामध्ये एखाद्या खेळाडूसाठी १० कोटींहून अधिक पैसे मोजले आहेत.

यासह इशान आयपीएलच्या १५ हंगामांच्या इतिहासातील आतापर्यंतचा चौथा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. तर तो भारतातील सर्वात दुसरा महागडा खेळाडू बनला आहे. मग त्याच्यापूर्वीचे महागडे खेळाडू कोण आहेत? ते पाहूया…

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू: (Most Expensive Players Of IPL History)
ख्रिस मॉरिस (राजस्थान): १६.२५ कोटी
युवराज सिंग (दिल्ली): १६ कोटी
पॅट कमिन्स (कोलकाता): १५.५० कोटी
इशान किशन (मुंबई): १५.२५ कोटी
काइल जेमिसन (बेंगलोर): १५ कोटी
बेन स्टोक्स (पुणे): १४.५० कोटी

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे भारतीय खेळाडू:
युवराज सिंग (दिल्ली)- १६ कोटी
इशान किशन (मुंबई)- १५.२५ कोटी
युवराज सिंग (बेंगलोर)- १४ कोटी
दिनेश कार्तिक (दिल्ली)- १२.५० कोटी
श्रेयस अय्यर (कोलकाता)- १२.२५ कोटी

महत्त्वाच्या बातम्या-

‘इशान’ बनला लिलावाची ‘शान’, मोडले सर्वच रेकॉर्ड! विक्रमी रकमेसह मुंबईच्या ताफ्यात

आता बटरलसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणा अश्विन! सेहवागने जुन्या वादाची काढली आठवण

स्वागत ‘पंड्या’जी लखनऊ में है! कृणाल पंड्यावर लागली अनपेक्षित बोली, रक्कम पाहून सर्वच चकित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---