---Advertisement---

‘त्या’ दोघांपासून टीम इंडियाला धोका! नव्या भूमिकेत आलेल्या कार्तिकने दिला इशारा

On: मंगळवार, फेब्रुवारी 7, 2023 9:54 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकमेकांचा सामना करणार आहेत. मालिकेतील पहिल्या नागपूर कसोटीला (Nagpur Test) सुरुवात होण्यापूर्वीच या मालिकेसाठी जोरदार माहौल तयार होताना दिसतोय. अनेक माजी क्रिकेटपटू या मालिकेविषयी आपली मते व्यक्त करत आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज व सध्या समालोचक म्हणून भूमिका पार पाडणारा दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने या मालिकेत भारताला डोकेदुखी ठरू शकणाऱ्या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंची नावे सांगितली आहेत.

नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 9 फेब्रुवारी रोजी पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी, अनेकांनी ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेत विजय मिळवेल असे म्हटले. दिनेश कार्तिक याने नुकताच ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेमध्ये कोणते दोन खेळाडू भारतीय संघासाठी धोका निर्माण करू शकतात असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्याने ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ व वरिष्ठ फिरकीपटू नॅथन लायन यांचे नाव घेतले.

 

स्मिथ व लायन यांनी भारतात नेहमी चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने 2017 मध्ये खेळलेल्या मालिकेत स्मिथ याने चार सामन्यात एका शतकाच्या मदतीने 499 धावा केल्या होत्या. तर, लायनने चार सामन्यात सर्वाधिक 19 भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला. ऑस्ट्रेलियन संघाला यावेळी देखील यश मिळवायचे असल्यास या दोन्ही खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा आणखी उंचवावा लागेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे खेळला जाईल. त्यानंतर दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान पार पडेल. याव्यतिरिक्त तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ धरमशाला येथे 1 ते 5 मार्चदरम्यान भिडतील. मालिकेतील अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्चदरम्यान पार पडेल.

(Dinesh Karthik Thinking Steve Smith And Nathan Lyon Big Threats For India In Border-Gavaskar Trophy)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

हरमन-स्मृतीसह ‘या’ 24 जणी उतरणार सर्वोच्च बेस प्राईसने WPL लिलावात, 409 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर 

पाकिस्तानमध्ये पुन्हा फिक्सिंग! आफ्रिदीवर दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---