---Advertisement---

दिनेश कार्तिक पुन्हा करणार चौकार-षटकारांची आतषबाजी! नव्या लीगशी करार, राशिद खानचाही संघात समावेश

On: बुधवार, ऑक्टोबर 16, 2024 5:44 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर आता वेगवेगळ्या लीगमध्ये खेळत आहे. अलीकडेच कार्तिक लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळला होता. आता त्यानं आणखी एका लीगशी करार केला आहे. आरसीबीच्या या माजी यष्टीरक्षक फलंदाजानं यावर्षी जूनमध्ये आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

दिनेश कार्तिकनं दुबईत खेळल्या जाणाऱ्या अबू धाबी टी10 लीगसोबत करार केला आहे. दिनेश कार्तिकसह राशिद खान आणि जोस बटलर सारख्या मोठ्या खेळाडूंनी देखील या टी10 लीगशी करार केलाय. अबू धाबी टी10 लीगमध्ये आधीपासूनच जगभरातील अनेक स्टार खेळाडू खेळतात. आता यात कार्तिक, राशिद आणि बटलर यांच्या नावांचा देखील समावेश झाला.

आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या 39 वर्षीय कार्तिकनं काही महिन्यांपूर्वीच क्रिकेटला अलविदा केलं होतं. त्यानंतर आता तो वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक दिसत आहे. सर्वप्रथम त्यानं लिजेंड्स लीग क्रिकेटशी करार केला. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी20 लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघात सामील झाला. इतकेच नाही तर, आयपीएलचा संघ आरसीबीनं कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

अबू धाबी टी10 लीगमध्ये दिनेश कार्तिक बांगला टायगर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्यासोबत बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनचाही या संघात समावेश आहे. याशिवाय अफगाणिस्तानच्या रशिद खानलाही बांगला टायगर्सनं संघात स्थान दिलंय. जोस बटलरबद्दल सांगायचं झालं तर, त्यानं डेक्कन ग्लॅडिएटर्सशी करार केला. दुबईमध्ये होणारी ही टी10 लीग 21 नोव्हेंबरपासून सुरू होत असून स्पर्धेचा अंतिम सामना 2 डिसेंबरला होणार आहे.

हेही वाचा – 

‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये एबी डिव्हिलियर्सचा समावेश, माजी भारतीय क्रिकेटपटूलाही मिळाला सन्मान
भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट, मालिका ड्रॉ झाल्यास कोणाचा फायदा? जाणून घ्या
वरुणराजा थांबेना! भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---