इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम सध्या प्लेऑफच्या दिशेने जात आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व सहभागी संघ जीवाचे रान करताना दिसत आहेत. अशात रविवारी (१ नोव्हेंबर) दुबईच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स संघात हंगामातील रंगतदार लढत झाली. या लढतीत कोलकाताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने अप्रतिम झेल पकडला.
राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आणि कोलकाताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यानंतर कोलकाताने मर्यादित २० षटकात ७ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. कोलकाताच्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच राजस्थानने रॉबिन उथप्पाची विकेट गमावली.
मात्र सलीमीवीर फलंदाज बेन स्टोक्स संघाला विजय मिळवून देण्याच्या उद्देशाने पहिल्या षटकापासूनच जोरदार फटकेबाजी करत होता. त्याने १० चेंडूत २ चौकार आणि १ षटकार लगावत १८ धावाही केल्या होत्या. परंतु, डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या पॅट कमिन्सने कार्तिकच्या हातून त्याला झेलबाद केले.
स्टोक्सने कमिन्सच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू त्याच्या बॅटला कडेला लागला. अशात यष्टीमागे उभा असलेल्या कार्तिकने वेगाने डाव्या बाजूला झेप घेतली आणि स्टोक्सने मारलेला तो चेंडू झेलला. कार्तिकच्या त्या अनपेक्षित झेलला पाहिल्यानंतर संघातील इतर खेळाडूंचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता.
This is some grab from Dinesh karthik😱😱😱😱. pic.twitter.com/xiL6bGQ8hX
— Ian Raphael Bishop (@irbishi) November 1, 2020
https://twitter.com/ipl2020videos/status/1322939830204993537
"Catches win Matches" 🌟🌟🌟
Has to be one of the finest catch of IPL 2020. What a catch from Dinesh Karthik. #KKRvRR #KKR #VakeelSaab #IPL2020 #RR pic.twitter.com/21Z3DFYqYM
— Siva Harsha (@SivaHarsha_23) November 1, 2020
https://twitter.com/gowtham7gowtham/status/1322946118540382209
एवढेच नाही तर, पुढे कार्तिकने राजस्थानच्या संजू सॅमसन आणि रियान परागचाही झेल घेतला. मात्र यष्टीरक्षणात प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या कार्तिकला फलंदाजीत मात्र जलवा दाखवता आला नाही. तो रजास्थानविरुद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
मार्केट पडल्यावर ऋतुराज गायकवाडचा ट्रकभर कांदा मार्केटमध्ये, सीएसकेच्या विजयानंतर मीम्सचा पाऊस
‘ही’ प्रसिद्ध कंपनी बनली महिला आयपीएलची टायटल स्पॉन्सर, बीसीसीआयने केली घोषणा
पुरंदरच्या ‘या’ पठ्ठ्याने चेन्नईची लाज राखली; सलग तीनही सामन्यात ठोकली अर्धशतके
ट्रेंडिंग लेख-
सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ
एका ऑस्ट्रेलियननेच त्याला बनवले ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण