भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक सध्या मैदानावर नव्हे तर मैदानाबाहेर जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. तो एजेस बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चालू असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत आहे. या नव्या क्षेत्रात धुव्वादार पदार्पण करत क्रिकेट चाहत्यांनी मने जिंकली आहेत. दरम्यान लाईव्ह सामन्यात समालोचन करत असताना त्याच्यात आणि सहकारी समालोचक व इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू नासिर हुसैन यांच्यात मजेशीर किस्सा घडला.
तर झाले असे की, पावसाच्या व्यतत्यानंतर शनिवार रोजी (२० जून) भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याची सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागल्याने त्यांनी प्रथम गोलंदाजी निवडली होती. यामुळे सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची सलामी जोडी मैदानावर आली होती. २१ व्या षटकापर्यंत त्यांनी ६२ धावांची भागिदारी साकारली. रोहित ६८ चेंडूत ३४ धावा करत पव्हेलियनला परतल्याने त्यांच्या भागिदारीवर अंकुश लागला.
या खेळीमध्ये विस्फोटक फलंदाज रोहितने ६ चौकार मारले. यात त्याच्या अप्रतिम पुल शॉटचाही समावेश होता. त्याच्या या नेत्रदिपक पुल शॉटला पाहून समालोचक नासिर हुसैनही प्रभावित झाले. ते म्हणाले की, “रोहित हा शॉर्ट चेंडूवर पुल शॉट मारणारा महान फलंदाज आहे. तो स्पिन चेंडूविरुद्ध खेळताना त्याच्या पायाचा अगदी योग्य वापर करतो. याद्वारे त्याचा सकारात्मक स्पष्ट होतो.”
नासिर हुसैन यांच्या या वक्तव्यावरुन त्यांना ट्रोल करण्याची मिळालेली संधी दिनेश कार्तिकने सोडली नाही. तो नासिर हुसैन यांना प्रत्युत्तर देताना म्हणाला की, “होय. अगदी तुमच्या उलट.” अर्थात दिनेश कार्तिकने हसत म्हटले की, रोहित पुल शॉट खेळण्यात पटाईत आहे. परंतु नासिर हुसैन यांना तो शॉट अजिबात जमत नाही.
पहिल्यांदाच समालोचन करत असलेल्या दिनेश कार्तिकचे चातुर्य आणि प्रसंगावधान पाहून सामना दर्शक प्रभावित झाले आहेत. अनेकांनी नासिर हुसैन आणि दिनेश कार्तिक यांच्यात घडलेल्या मजेशीर संवादाचे कौतुक केले आहे. तर काहींनी नासिर हुसैन यांना ट्रोल केले आहे.
#WTC2021Final #IndiaVsNewZealand #WTCFinal21 #dineshkarthik
Literally me to #ICC after seeing their decision to put Dinesh Karthik at the commentary box pic.twitter.com/FqOcO0DMab
— Debanshi Biswas (@BiswasDebanshi) June 19, 2021
Nasser Hussein after Dinesh karthik commentary #dineshkarthik pic.twitter.com/L3ELIoSqIw
— Meraj Khan (शेखर)🇮🇳 (@merajkhan_) June 19, 2021
Nasser Hussain: Rohit is a great puller of the short ball. Uses his feet well against spin. Shows positive intent.
Dinesh Karthik: yes, exactly the opposite of you🤣😭🤣😭
Absolute gold sledging in the commentary🤣😭— ?????? (@momoschahiye) June 19, 2021
Dinesh Karthik sledging Nasser Hussain in the commentary box. GOLD! 😅#INDvNZ
— S A N G H I 🚩 (@tweet2shanty) June 19, 2021
Dinesh Karthik upping the commentary game, more importantly just get into direct points and at times cheeky as well. #INDvNZ
— Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2021
Dinesh Karthik might be my favourite commentator already. And I heard him talk only for half an hour.
It says something about the standards as well I guess in Indian commentary.#WTCFinal21 #WTCFinal2021
— Gurkirat Singh Gill (@gurkiratsgill) June 19, 2021
दिनेश कार्तिक हा कसोटी अजिंक्यपद सामन्यासाठीच्या इंग्रजी समालोचकांच्या पॅनेलचा भाग आहे. त्याच्याबरोबर माजी भारतीय सलामीवीर सुनिल गावसकर हे आहेत. तसेच कुमार संगकारा, नासिर हुसैन, सायमन ड्यूल, ईशा गुहा, इयान बिशप, मायकेल अॅथर्टन आणि क्रेग मॅकमिलन यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाऊस आमचा जल्लोष काय थांबवणार’, म्हणत चाहत्यांनी गायले हिटमॅन सॉन्ग; एकदा ऐकाच
क्रिकेट रसिकांना घडले विराटच्या अप्रतिम कव्हर ड्राईव्हचे दर्शन अन् पाकिस्तानी कर्णधार झाला ट्रोल