गेल्या २ टी२० सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मंगळवारी १४ जूनला भारतीय संघ तिसऱ्या टी२० मध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करेन. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेतील तिसरा टी२० सामना विशाखापट्टनम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए मैदानावर खेळला जात आहे. तर तिसऱ्या टी२० मध्ये विजय मिळवण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिककडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र तो या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही.
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर एका मुलाखतीत म्हणाला की, “दिनेश कार्तिकसाठी ही मालिका टी२० विश्वचषकाच्या संघात प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्वाची असेल. त्याने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरसाठी जे काम केले तेच काम त्याला भारतीय संघासाठी करावे लागणार आहे. मात्र ज्याप्रकारे अक्षर पटेलला त्याच्या आधी फलंदाजीसाठी पाठवल्यात आले त्यावरून तरी असे वाटते की तो टी२० विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठीच्या शर्यतीत नाही. मी अपेक्षा करतो की, त्याला अजुन फलंदाजी करण्याची संधी मिळावी. भारताला नक्कीच एका दिनेश कार्तिकसारख्या मॅच फिनिशरची गरज आहे. मात्र जर भारतीय संघाचे कर्णधार आणि व्यवस्थापन अक्षर पटेलला ७व्या क्रमांकावर खेळवणार असेल तर भारताची फलंदाजी कमी होऊन जाईल.”
दरम्यान, यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने तब्बल तीन वर्षांनंतर भारतीय टी२० संघात पुनरागमन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२च्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून खेळताना दिनेश कार्तिक याने शानदार फटकेबाजी केली. या हंगामात त्याने बेंगलोर संघासाठी फिनिशरची भूमिका साकारत संघाला अनेक विजय मिळवून दिले. कार्तिक याने या हंगामात १६ सामन्यात फलंदाजी करताना ५५च्या सरासरीने १ अर्धशतक झळकावत ३३० धावा चोपल्या होत्या. यादरम्यान त्याची नाबाद ६६ ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उत्तर प्रदेशविरुद्ध उपांत्य सामन्यात जयस्वालची ‘यशस्वी’ खेळी, मुंबईसाठी ठोकले शतक
अर्रर्र! इंग्लंडने पार धुव्वा केला, विरोधी संघाला केवळ ४५ धावात गुंडाळले
आयसीसी महिला वनडे क्रमवारीत भारताच्या ‘या’ त्रिकुटाचे नाणे खणकतयं; वाचा सविस्तर