भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त समोर येत आहे. याला कारण ठरली त्याने केलेली इंस्टाग्राम पोस्ट. 37 वर्षीय कार्तिकने भारताकडून शेवटचा सामना ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकात खेळला.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने गुरूवारी (24 नोव्हेंबर) एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यावरून तो निवृत्ती घेत आहे असा संकेत त्याने स्वत: हाच दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या आठव्या टी20 विश्वचषकात तो भारताचा फिनिशर आणि विकेटकीपर म्हणून संघात सामील झाला, मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
कार्तिकने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘भारतासाठी टी20 विश्वचषक खेळण्याच्या उद्दिष्टासाठी कठोर परिश्रम केले आणि हे करणे खूप अभिमानास्पद आहे. आम्ही अंतिम हेतूपासून कमी पडलो, परंतु यामुळे माझे आयुष्य खूप आठवणींनी भरले. माझ्या सर्व सहकारी खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, मित्रांचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या चाहत्यांचे अखंड समर्थनासाठी धन्यवाद’ त्याच्या या विधानावरून तो लवकरच आंतरराष्ट्रीय टी20मधून निवृत्ती घेतो की काय असे अंदाज लावले जात आहेत.
https://www.instagram.com/reel/ClTXsDHoaS5/?utm_source=ig_web_copy_link
कार्तिक कारकिर्दीत नेहमीच आत-बाहेर होत राहिला. त्याने 5 डिसेंबर 2004 भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपला पहिला सामना इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर खेळला होता. त्याने शेवटचा सामना याच महिन्यात टी20 विश्वचषकात खेळला. त्याने 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात 7 धावा केल्या होत्या.
कार्तिकने भारताकडून शेवटचा वनडे सामना 2019च्या विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध खेळला. त्यानंतर त्याला संघात जागा मिळाली नाही. यामुळे सगळ्यांना वाटले त्याची कारकिर्द संपली. त्याने आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारताच्या टी20 संघात पुनरागमन केले. Dinesh Kartik Instagram Post goes viral write goal of playing the T20 World Cup for India
कार्तिकची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द
कसोटी, 26 सामने – 1025 धावा
झेल- 57, स्टम्पिंग – 6
वनडे, 94 सामने – 1752 धावा
झेल- 64, स्टम्पिंग – 7
टी20, 60 सामने- 686 धावा
झेल- 30, स्टम्पिंग – 8
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवी! मैदानावर क्रिकेट खेळताना दुखापती झाल्याने निधन झालेले 3 खेळाडू
NZvIND: पहिल्या वनडेत भारताची धमाकेदार सुरूवात! शिखर धवननंतर शुबमन गिलचीही फिफ्टी