आशिया चषका 2023 मधील भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यात शनिवारी सामना रंगला होता. मात्र, या महान सामन्यादरम्यान पावसाने घोळ घातला. भारताची फलंदाजी संपल्यानंतर पाऊस चालू झाला. काही वेळ वाट पाहून सामन रद्द करण्यात आला. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. तिन्ही वेगवान गोलंदाजांनी मिळून भारताच्या सर्व विकेट घेतल्या आणि संपूर्ण षटकही खेळू दिले नाही. शाहीन शाह आफ्रिदीने 4, नसीम शाहने 3 आणि हरिस रौफने 3 बळी घेतले. यामुळेच भारतीय संघ 49 व्या षटकातच सर्वबाद झाला. यावर भारतीय संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकने वक्तव्य केले आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याने पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज भारताच्या तीन वेगवान गोलंदाजांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे वर्णन केले. क्रिकबझवरील संभाषणात तो म्हणाला की, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह हे 90 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतात. हे तिन्ही वेगवान गोलंदाज खूप वेगळे आहेत. शाहीन हा डावखुरा गोलंदाज असून तो चेंडू आत आणतो. नसीम शाह दोन्ही बाजूंनी स्विंग करतो. हारिस रौफ हा आमच्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि शेवटी तो शानदार गोलंदाजी करतो. त्यांचा बाऊन्सर खूप मजबूत आहे. माझ्या मते पाकिस्तानचे गोलंदाज सपाट खोळपट्टीवर जास्त प्रभावी ठरतात.”
पुढे कार्तिक म्हणाला की, “खेळपट्टी मदत करत असेल तर भारत आणि पाकिस्तानचे गोलंदाज बरोबरीचे असतात. बुमराह, शमी आणि सिराज यांना गोलंदाजी करण्यासाठी सोपे जाईल कारण त्यांच्याकडे पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांइतका बाऊन्स नाही.” असेही तो म्हणाला.
भारत-नेपाळ सामना रंगणार
आशिया चषकातील पाचवा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी (4 सप्टेंबर) खेळवा जाणार आहे. यात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अनुपस्थीत असणार आहे. त्याला मुलगा झाल्यामुळे तो मुंबईला परतला आहे. यामुळे भरतीय संघाचा अनुभवी गोंदाज मोहम्मद शमीला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (dinsesh kartik say’s pakistani bowler is best)
महत्वाच्या बातम्या-
‘राजकारणामुळे क्रिकेटची वाट लागली’, सुनील गावसकरांचे वक्तव्य खरे की खोटे? जाणून घ्या
कुठे आणि कसा पाहायचा भारत विरुद्ध नेपाळ सामना?, जाणून घ्या लगेच