---Advertisement---

खुद्द रोहित शर्मानेच दिला विंडीज विरुद्ध तो नाबाद असल्याचा पुरावा

On: शनिवार, जून 29, 2019 3:01 PM
---Advertisement---

मँचेस्टर। 2019 विश्वचषकात गुरुवारी(27 जून) भारत विरुद्ध विंडीज संघात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 34 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

मात्र या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला त्याची विकेट 6 व्याच षटकात 23 चेंडूत 18 धावांवर असताना गमवावी लागली होती. पण त्याच्या या विकेटने मोठा वाद निर्माण केला.

यानंतर आता रोहितने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तो नाबाद असल्याचे सुचवले आहे. त्याने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दिसते की बॅट आणि चेंडूमध्ये अंतर आहे. तसेच चेंडू बॅटला नाही तर पॅडला लागला आहे.

या सामन्यात जेव्हा रोहितला बाद दिले गेले तेव्हा झाले असे की केमार रोच गोलंदाजी करत असलेल्या सहाव्या षटकातील शेवटचा चेंडूवर विंडीजने रोहित यष्टीमागे झेलबाद झाल्याचे अपिल केले.

यावेळी चेंडू बॅटच्या आतली कड घेऊन यष्टीरक्षक शाय होपच्या हातात गेला असल्याचे विंडीजच्या खेळांडूंचे मत होते. पण मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी रोहितला नाबाद देत हे अपिल फेटाळले.

परंतू विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. या रिव्ह्यूने सर्वांना आणखी गोंधळात टाकले. कारण चेंडू बॅट आणि पॅडच्या मधे दिसत होता. तसेच अल्ट्राएजमध्ये काही स्पाईक दिसत होते. पण बॉल नक्की पॅडला लागला आहे की रोहितच्या बॅटला लागला हे लक्षात येत नव्हते.

पण आणखी जवळून बघण्याआधीच थर्ड अंपायर मायकल गफ यांनी रोहितला बाद दिले. यावर रोहितनेही नाराजी व्यक्त केली. पण गफ यांनी बाद दिल्याने रोहितला ड्रेसिंगरुममध्ये परतावे लागले.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून कारकिर्दीत आलेल्या परिवर्तनाबद्दल शमीने दिले स्वत:लाच श्रेय

सॅल्यूट सेलिब्रेशनची कॉपी करण्याबद्दल शमीला शेल्डन कॉट्रेलने दिले हिंदीत उत्तर

व्हिडिओ: आज पावसामुळे नाही तर चक्क मधमाशांमुळे थांबला दक्षिण आफ्रिका-श्रीलंकामधील सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment