Loading...

भज्जी, तूझ्या ह्या असल्या स्वभावामुळेच तू टीम इंडियाच्या बाहेर आहेस!

राजकोट | एकवेळ क्रिकेट जगतावर अधिराज्य करणारी विंडीज टीम सध्या अतिशय खराब कालखंडातून जात आहे. १९९४ पासून या संघाला भारतात कसोटी सामना जिंकता आला नाही.

एकेवेळी भारताला भारतात सर्वाधिक सामन्यांत पराभूत करणारा विंडीज संघ सध्या डावाने पराभव कसा टाळता येईल यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहे.

त्यामुळे जगभरातील चाहत्यांच्या रोषाला, टीकेला हा संघ सामोरा जात आहे. त्यातच अनेक माजी दिग्गज खेळाडूही या संघावर चौफेर टीका करत आहे. त्यात सध्या भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची भर पडली आहे.

“मला एक प्रश्न आहे की विंडीजचा हा संघ प्लेट गटातून तरी रणजी ट्राॅफीची उपउपांत्यफेरी गाठले का? इलिट गटातून तर हे प्रचंड अवघड काम आहे. ” असे भज्जीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Loading...

यावर चाहत्यांनी मात्र विंडीजला पाठिंबा देताना भज्जीवर जोरदार टीका केली आहे.

Loading...

Loading...

Loading...

महत्वाच्या बातम्या-

You might also like
Loading...