पुणे: रोझ सय्यद, भूमिका खिलारे, तन्मय कांबळे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरुवर्य श्री संजीवजी जनार्दन नाईक सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
आमदार मुक्ताताई टिळक यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा शुक्रवार पेठेतील नातू बाग मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या ४८ ते ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत रोझ सय्यदने शिखा यादववर मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. रोझच्या आक्रमक खेळासमोर शिखाचा निभाव लागला नाही. शिखाची आता सुवर्णपदकासाठी भूमिका खिलारेविरुद्ध लढत होईल. भूमिकाने दुस-या उपांत्य लढतीत ईशप्रीत कटारियावर ५-० ने मात केली.
यानंतर सब-ज्युनियर मुलांच्या ३५ ते ३७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत तन्मय कांबळेने सुहम जाधवला ४-१ ने पराभूत केले. आता तन्मयची विजेतेपदासाठी रणवीर कटारियाविरुद्ध लढत होईल. दुस-या उपांत्य फेरीत रणवीरने प्रभू छलवाडीवर ५-० ने विजय मिळवला.
निकाल : उपांत्य फेरी – सब ज्युनियर मुली – ३५ ते ३७ किलो – श्रावणी गायकवाड वि. वि. संध्या सोनवाल, सोनिया सूर्यवंशी वि. वि. श्रेया धांधर. ३७ ते ४० किलो – आर्या गर्दे वि. वि. वेधा शिंदे, झिनत शेख वि. वि. आर्या कोंडके. ४० ते ४३ किलो – माही शिंदे वि. वि. आराध्या पवार, प्रांजल आठवले वि. वि. आर्या पगारे. ४३ ते ४६ किलो – साशा हरपाळे वि. वि. ओवी पावले, सृष्टी दोडमिसे वि. वि. ईशिका मंडल.
ज्युनियर मुली – ४४ ते ४६ किलो – अक्षदा जाधव वि. वि. तनीषा कांबळे, सृष्टी चोरगे वि. वि. जान्हवी घोडे. ४६ ते ४८ किलो – तनिष्का कांबळे वि. वि. समिक्षा सूर्यवंशी, ज्ञानदा जमादार वि. वि. खुशी तरडेल. ५० ते ५२ किलो – रिया कुटे वि. वि. आकांक्षा पोलकम, एलिझा झोव्हिस वि. वि. नयना गवळी.
एलिट मुली – ५२ ते ५४ किलो – अनुराधा वि. वि. मुनवी ओव्हाळ, खुशी परदेशी वि. वि. साक्षी वाडेकर. ५४ ते ५७ किलो – प्रियान शिर्के वि. वि. हर्षदा लोहत, ऋतुजा रणदिवे वि. वि. सिद्धी उजागर. ५७ ते ६० किलो – राखी घाडगे वि. वि. श्रद्धा पगारे, तेजवीर सहोटा पुढे चाल वि. ऋतुजा काळे. ६० ते ६३ किलो – गौरी साकळे वि. वि. दीक्षा राक्षे, काया चौधरी वि. वि. श्रावणी काटकर.
सब-ज्युनियर मुले – ३७ ते ४० किलो – आर्यन सरतापे वि. वि. सुयश धेंडे, वेदांत भिलारे वि. वि. कल्पेश बिका. ४० ते ४३ किलो – प्राश्ती मोरे वि. वि. सुयश कोंढाळकर, निखिल पाल वि. वि. नीरज गायकवाड. ४३ ते ४६ किलो – शौर्य द्विवेदी वि. वि. प्रितेश राठोड, साईराज चौधरी वि. वि. साद खान. ४६ ते ४९ किलो – साद शेख वि. वि. आर्यन सोनावणे, उदय घोरपडे वि. वि. यशदानी शेख. ४९ ते ५२ किलो – क्षिती जाधव वि. वि. आयुष पवार, निमिष हुबळीकर वि. वि. शिवम भोईर. (District level boxing competition. Rose, Bhumika, Tanmay in the finale)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एसएबीए कप बॅडमिंटन स्पर्धा । लोकेश, अदिती काळे, अदिती रोडे अंतिम फेरीत
उलटी पॅन्ट घालून रिद्धिमान साहा मैदानात, जाणून घ्या का घडला हास्यास्पद प्रकार