पुणे । डिव्हाईन स्टार्स ग्रुप, पुणे व एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसयांच्या तर्फे आयोजित पहिल्या एक्सेल टी-20 महिला प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत डिव्हाईन स्टार्स, शेलार ग्रुप या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
धायरी येथील स्टार स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी व व्हिजन स्पोर्ट्स क्रिकेट अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात आदिती गायकवाड(1-24 व 33धावा)हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डिव्हाईन स्टार्स संघाने ईश्वरी ग्रुप संघाचा ८गडी राखून पराभव करत शानदार सुरूवात केली.
प्रथम फलंदाजी करताना डिव्हाईन स्टार्स संघाने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे ईश्वरी ग्रुप संघाला 20षटकात 7बाद 94धावाच करता आल्या. निकिता आगेने सर्वाधिक 29धावा केल्या. डिव्हाईन स्टार्स संघाकडून निकिता भोरने(3-21), प्रिया सिंगने(2-13), आदिती गायकवाडने(1-24)यांनी सुरेख गोलंदाजी केली.
डिव्हाईन स्टार्स संघाने 16.4षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 96धावा करून पूर्ण केले. यात वैष्णवी रावलीयाने 51चेंडूत 34धावा, आदिती गायकवाडने 39 चेंडूत 33धावा करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याची मानकरी आदिती गायकवाड ठरली.
दुसऱ्या सामन्यात सोनिया डबीरने केलेल्या नाबाद 75धावांच्या जोरावर शेलार ग्रुप संघाने ट्रँटरचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना ट्रँटर संघाने 20षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 154धावा धावा करून पूर्ण केले. यामध्ये मुक्ता मोगरेने नाबाद 77धावा, माधुरी आघावने 21धावा, नेहा चावडाने 32धावा केल्या.
शेलार ग्रुपकडून वैष्णवी काळे 1-19, कोमल झंझाद(1-28), श्वेता खटाळ(1-32) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेलार ग्रुप संघाने 20षटकात 3बाद 155धावा करून पूर्ण केले. सोनिया डबीरने 50 चेंडूत 6चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 75धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सोनिया डबीरने कोमल झंझादने नाबाद 21धावा, वैष्णवी काळेने 16धावा, तेजश्री ननावरेने 14धावा केल्या.
स्पर्धेचे उदघाटन सुभेदार भोपाल सिंग, माजी भारतीय महिला संघाच्या कर्णधार नीलिमा जोगळेकर आणि एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटसचे चेअरमन संजय देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. एक्सेल इंजिनिअर्स अँड कन्सलटंटस संचालक संदीप चिंचबनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सिमेवर लढणार्या आणि शहीद होणार्या शुरसैनिकांच्या कुटूंबियांना ५१,०००/-रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
ईश्वरी ग्रुप: 20षटकात 7बाद 94धावा(निकिता आगे 29(32,3×4), ऋतू भोसले 10(6), निकिता भोर 3-21, प्रिया सिंग 2-13, आदिती गायकवाड 1-24) पराभूत वि.डिव्हाईन स्टार्स: 16.4षटकात 2बाद 96धावा(वैष्णवी रावलीया 34(51,4×4), आदिती गायकवाड 33(39,3×4), भरती फुलमाळी नाबाद 9, कृतिका टेकाडे नाबाद 8, मंजुश्री भगत 1-18);सामनावीर-आदिती गायकवाड;
ट्रँटर: 20षटकात 3बाद 154धावा(मुक्ता मोगरे नाबाद 77(63,12×4,1×6), माधुरी आघाव 21(20,4×4), नेहा चावडा 32(25,6×4), वैष्णवी काळे 1-19, कोमल झंझाद 1-28, श्वेता खटाळ 1-32)पराभूत वि.शेलार ग्रुप: 20षटकात 3बाद 155धावा(सोनिया डबीर नाबाद 75(50,6×4,5×6)., कोमल झंझाद नाबाद 21(17), वैष्णवी काळे 16(40), तेजश्री ननावरे 14(14), आदिती जोशी 1-9, ज्योती शिंदे 1-16, संजना शिंदे 1-23);सामनावीर-सोनिया डबीर.