टोकियो ऑलम्पिक २०२० मध्ये कुस्तीपटू रवी कुमार दहियाच्या विजयानंतर त्याचे गाव नाहरीमध्ये ग्रामस्थांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. गावातील चौकात ग्रामस्थांनी कुस्ती पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनचे नियोजन केले होते. कुस्तीच्या अंतिम टप्प्यात जेव्हा रवीने कजाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट केले, तेव्हा गावातील युवकांनी ढोल ताशाच्या गजरावर नाचायला सुरुवात केली.
त्यांना अंतिम सामन्यातही त्याच्याकडून विजयासह सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. परंतु रशियाच्या झावूर युगवेवने ७-४ अशा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केले. रवीला ऑलिम्पिक रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
ग्रामस्थांनी केली नारेबाजी
ग्रामस्थांनी रवीच्या उपांत्य सामन्यातील विजयाच्या आनंदामध्ये ‘भारत माता की जय’ ‘रवी कुमार जिंदाबाद’ अशी नारेबाजी केली होती. त्यांनी रवीच्या वडिलांचा सत्कारदेखील केला होता. त्यानंतर युवकांनी गावातील गल्लीबोळांमध्ये ढोल ताशांच्या गजरावर नृत्य केले होते.
ग्रामस्थांनी साजरी केली दीपावली
संध्याकाळी ग्रामस्थांचा आनंद अधिकच वाढला. ग्रामस्थांनी रवीला मिळालेल्या विजयाच्या आनंदात गावात दिवे लावून आनंद साजरा केला. रवीच्या घरातील त्याच्या आई, बहीण आणि अन्य सदस्यांनी दिवे लावून आनंदोत्सव केला. रवीच्या घरावर तिरंगा देखील फडकवण्यात आला होता. गावात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. रवीची आई तिच्या मुलाच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. आईने त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली असून तो माघारी आल्यावर त्याला चुरमा (चुरमा लाडू) चारून त्याचे स्वागत करणार, असे त्या म्हणाल्या आहेत.
चौकात मोठी स्क्रिन बसवून पाहिला अंतिम सामना
कुस्तीपटू रविकुमार दहियाचा अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी गावातील चौकात मोठी स्क्रिन लावण्यात आली होती. ग्रामस्थांनी त्याच्या विजयासाठी पूजा-आर्चनाही केली होती. मात्र त्याच्या हाती निराशा आली. तरीही तो रौप्य पदाकाचा मानकरी ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चंदेरी यश! रवी कुमारच्या नावे ‘रौप्य’; भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळाले पाचवे मेडल
विनेश फोगटचे ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न भंगले, नाही होता येणार रेपचेज राउंडमध्ये सहभागी
कझाखस्तानी कुस्तीपटूचे लाजिरवाणे कृत्य, चालू सामन्यात रवी दहियाला चावला; झाली सडकून टीका