---Advertisement---

‘चुकांमधून धडा घेत नाहीत…’, सॅमसनला संधी न दिल्यामुळे माजी दिग्गज संघ व्यवस्थापनावर भडकला

On: बुधवार, नोव्हेंबर 23, 2022 2:44 PM
Sanju-Samson
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पण उभय संघांतील टी-20 मालिकेत त्याला खेळण्याची संधी दिली गेली नाही. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर चाहते आणि क्रिकेटचे जाणकार नाराजी व्यक्त करत आहेत. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आणि यामुळे चाहत्यांचा संताप अधिकच वाढला. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू डोडा गणेश यांनी देखील सोशल मीडियावर सॅमसला संधी मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. 

न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी संज सॅमसन (Sanju Samson) याला संघात निवडले. पण प्रत्यक्षात खेळण्याची संधी मात्र सॅमसनला मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारताचे नेतृत्व करत होता आणि यष्टीरक्षकाच्या रूपात रिषभ पंत (Rishabh Pant) प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होता. सॅमसनला मात्र मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. आता याच पार्श्वभूमीवर डोडा गणेश (Dodda Ganesh) यांनी स्वतःचे मत मांडले आहे.

न्यूजीलैंड के खिलाफ तीसरे और आखिरी टी20 इंटरनैशनल मुकाबले में ऋषभ पंत को बतौर विकेटकीपर मौका दिया. वहीं श्रेयस अय्यर ने नंबर चार पर बैटिंग की. भारत ने सीरीज के दूसरे मैच में जीत हासिल की थी. पहला मैच बारिश की भेंट चढ़ गया वहीं तीसरे मैच बरसात की वजह से पूरा नहीं हो पाया. मंगलवार को सीरीज के आखिरी मैच में न्यूजीलैंड ने चार विकेट पर 160 रन बनाए जिसके जवाब में भारत ने 9 ओवर में 4 विकेट पर 75 रन बनाए थे. इसके बाद बारिश की वजह से आगे का खेल नहीं हो पाया. जब बारिश हुई तो डकवर्थ लुईस नियम के अनुसार भारतीय टीम का स्कोर बराबर था. यानी यह मैच टाई हो गया.

अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून डोडा गणेश यांनी ट्वीट करत संघ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली. ट्वीटमध्ये गणेश यांनी लिहिले की, “संजू सॅमसनला यावेळीही संधी मिळाली नाही. यावरून समजून घेणे कठीण आहे.” गणेश यांच्या मते सॅमसला संघात क्षेयस अय्यरच्या आधी संधी दिली गेली पाहिले होती. त्यांच्या मते भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्या चुकांमधून धडा घेतला पाहिजे. त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, “अय्यरला सॅमसनच्या आधी निवडून संघ व्यवस्थापनाने सिद्ध केले की, ते चुकांमधून शिकत नाहीयेत आणि टी-20 क्रिकेटमध्ये त्यांची विचारसरणी बदलणार देखील नाहीये.”

दरम्यान, टी-20 मालिकेनंतर आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. उभय संघांतील टी-20 मालिका देखील तीन सामन्यांची होती, पण पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मालिकेतील दुसरा सामना भारताने 65 धावांनी जिंकला. तर तिसरा सामन्या देखील पावसाने बाधा आणली होती. मात्र, पंचांनी डकवर्थ लुईस नियम वापरून नामना बरोबरीने सोडवला. उभय संघांतील पहिला एकदिवसीय सामना 25 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. एकदिवसीय सामन्यात शिखर धवन संघाचे नेतृत्व करणार असून सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, असी इच्छा चाहत्यांची आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार / यष्टीरक्षक), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक. (Doda Ganesh was upset because Sanju Samson was not given a chance in t20 series against New Zealand)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आमच्याकडे कितीही पैसे असले तरी आम्ही सूर्यकुमार यादवला बीबीएलमध्ये…’, ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलूचे विधान
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---