इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात रिंकू सिंग चर्चेत राहिला. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजाने पाच चेंडूत पाच षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. या वादळी खेळीनंतर रिंकूची फॅन फॉलोइंग रातोरात वाढली होती. भारतीय संघाचा हा युवा खेळाडू त्याच्या आयुष्यात सिंगल आहे की, त्याला गर्लफ्रेंड आहे, याविषयी अनेकांना प्रश्न पडले होते. आता रिंकूने स्वतःच यावर उत्तर दिले आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रिंकू सिंग (Rinku Singh) याने गुजरात टायटन्सच्या यश दयालला पाच षटकार मारले, जे कधीच विरसता येणार नाहीत. आयपीएल इतिहासात रिंकूच्या वादळी खेळीची नेहमीच नोंद राहणार आहे. त्याच्यासाठी आयपीएलचा हा हंगाम खऱ्या अर्थाने जबरदस्त राहिला. आयपीएल संपल्यानंतर त्याने मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंदही घेतली. मालदीवमधून त्याने आपले काही शर्टलेस फोटो पोस्ट केले होते. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला होता. अनेकांनी तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? असा प्रश्नही विचारला होता. याच पार्श्वभूमीवर रिंकूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याला गर्लफ्रेंडविषयी प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर त्याने उत्तर दिले की, “नाही मी सिंगल आहे.”
याच मुलाखतीत रिंकून तो एक सफाई कर्णचारी होता, असाही खुलासा केला. आयपीएलमध्ये चमकण्याआधीची परिस्थिती सांगताना रिंकू म्हणाला, “माझा भाऊ एका कोचिंग सेंटरमध्ये काम करत होता आणि त्यानेच मला त्याठिकाणी सफाई कर्णचारी म्हणून कामाला लावले होते. फरशी साफ करण्याचे काम मी तिथे करायचो. याच कारणास्तव मला क्रिकेट सोडावे लागले होते. नंतर मी आईला विश्वासात घेतले आणि सांगितले की, मी आपल्या खेळात सुधार करून आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकतो.”
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये रिंकूचे प्रदर्शन पाहून अनेकजण त्याला भारताचा भविष्यातील स्टार खेळाडू म्हणत आहेत. येत्या काळात त्याला भारतीय संघाचे बोलावणे येऊ शकते. कारण भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. असात संघाला रिंकूसारख्याच एखाद्या फिनिशरची नक्कीच गरज आहे. (Does Rinku, who hit five sixes in a row, have a girlfriend? The KKR star said it himself)
महत्वाच्या बातम्या –
रोहित 2025 पर्यंत कसोटी कर्णधारपदी कायम राहणार? माजी दिग्गजाने दिले उत्तर
निवृत्ती मागे घेतलेल्यानंतर मोईन अलीवर आयसीसीची मोठी कारवाई! जाणून घ्या कारण






