विराट कोहली मागच्या काही महिन्यांमध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतताना दिसला आहे. त्याने तीन वर्षांच्या शतकाचा दुष्काळ यावर्षी संपवला. असे असले तरी फिरकी गोलंदाजांविरोधात खेळताना विराट नेहमीच संयमाने खेळत असतो. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याला एक प्रश्न विचारला गेला होता, ज्याचे त्याने सविस्तर उत्तर दिले.
आशिया चषका 2022 अफगाणिस्तानविरुद्ध विराट कोहली (Virat Kohli) शतक ठोकले, जो सामना टी-20 फॉरमॅधील होता. तर नुकत्याच खेळल्या गेलेल्या बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात देखील त्याने शतकीय खेळी केली. अशात कसोटी फॉरमॅटध्ये विराटला शतक करताना पाहण्यासाठी चाहते इच्छुक आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (14 डिसेंबर) सुरू झाला आणि विरानटे पहिल्याच दिवशी स्वस्तात विकेट देखील गमावली. विराट पहिल्या डावात अवघी एक धाव करून बाद झाला. फिरकीपटू तैजूल इस्लान याने विराटला पायचीत पकडत तंबूद धाडले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वसीम जाफर (Wasim Jaffer) माध्यमांशी बोलत होता. यावेळी त्याने काही महत्वाच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी त्याला असाही प्रश्न विचारला गेला की, “फिरकीपटूंच्या विरोधात विराट गरजेपेक्षा जास्त सावधगिरीने खेळतो का?” या प्रश्नाचे उत्तर देताना जाफर म्हणाला, “नाही मी असे म्हणणार नाही. त्याची ही खेळी लहान होती, पण तो चेंडूची लेंथ समजून घेत होता. तैजूलसाठी मला वाटते की, त्याचे प्रदर्शन अजून थोडे सुधारले पाहिजे.”
“मीरपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांना अधिक संधी मिळणार आहे. तर मला असेही वाटते की, विराटने फिरकी गोलंदाजांविरुद्ध अजून थोडे चांगले प्रदर्शन केले पाहिजे.” भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 6 विकेट्सच्या नुकसानावर 278 धावा केल्या. संघाने ज्या पद्धतीने झटपट विकेट्स गमावल्या, त्यावरून जाफरला असेही वाटते की सामना चार दिवसांपेक्षा जास्त खेळला जाणाच्या शक्यता खूपच कमी आहे. (Does Virat Kohli play more cautiously against spinners? Answered by Wasim Jaffer)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA World Cup 2022: मोरोक्कोचा स्वप्नभंग, फ्रांस सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये; अर्जेंटिनाशी भिडणार
अश्विन-कुलदीप जोडीची कमाल, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव 300च्या पार