पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने विराट कोहली आणि बाबर आझम यांची तुलना करण्यास नकार दिला आहे. एकीकडे बाबर अतिशय खराब फॉर्ममधून जात आहे, तर विराट कोहली 2023 आणि आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम फॉर्ममध्ये होता. यासोबतच तो टी20 विश्वचषक फायनलमधील सामनावीर ठरला होता.
शाहिन आफ्रिदीला डावलून बोर्डाने टी20 विश्वचषकात बाबरला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पांढऱ्या चेंडू संघाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याने संघाची कामगिरी अत्यंत खराब राहली. यंदाटच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. बाबरच्या कर्णधारपदासोबतच त्याच्या फलंदाजीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांग्लादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत त्याने 0, 22 ,31 आणि 11 धावांची इनिंग खेळली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान कनेरिया म्हणाला की, बाबर आणि विराटची तुलना करू नये. विराट खरोखरच महान आहे. आणि त्याची कमतरता बाबरमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
स्पोर्ट्स तकशी संवाद साधताना कनेरिया म्हणाला, “त्याची (बाबर) तुलना कोण करत आहे? त्यांची तुलना ऐकून मला कंटाळा आला आहे. तुलनेबद्दल बोलत असताना विराटने किती धावा केल्या आहेत ते पहा. त्याने जगभरात धावा केल्या आहेत. तो खूप मोठा खेळाडू आहे. ही तुलना होणे शक्य नाही”
तो पुढे बोलताना दिनेश कनेरिया म्हणाला, “विराटची उंची (लोकप्रीयता) बघ. जेव्हा तो मैदानावर फिरतो तेव्हा ऊर्जा वेगळीच असते. आणि बाबर या बाबतीत जवळ येत नाही. म्हणून बाबरबद्दल जे काही केले गेले आहे ते वाहिन्यांनी (TV) केले आहे. जेणेकरून ते त्यांची प्रसिध्दी वाढवू शकतील. त्याच्याशी तुलना करणाऱ्यांसाठी माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण मी असे कधीच केले नाही. तुम्ही दोघांचेही आकडेवारी बघा”.
हेही वाचा-
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ‘पुजारा’ आणि ‘रहाणे’ची जागा कोण घेणार?
एकेकाळी आयपीएलची मोठी ऑफर नाकारली, आता खाजगी कंपनीत नोकरी करतो हा क्रिकेटर
7 महिन्यांची गर्भवती, बाळ पोटातून लाथा मारतंय…तरीही हार मानली नाही! पॅरा अॅथलीटनं पदक जिंकून रचला इतिहास