सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हा सामना खेळण्यात आला. बेंगलोर संघाने हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला.
प्रथम फलंदाजीस आलेल्या बेंगलोर संघाकडून खेळताना एबी डिविलियर्सने चांगली फटकेबाजी केली. त्याने अवघ्या २४ चेंडूत ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. दरम्यान तो १८ चेंडूत ३८ धावांवर खेळत होता आणि १८ वे षटक मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट टाकत होता. त्याने आपल्या षटकातील टाकलेला ४ था चेंडू थेट डिविलियर्सच्या हेल्मेटला जाऊन लागला. तो चेंडू लेग बाय देत डिविलियर्सने त्यावर एक धाव घेतली. स्ट्राईक बदलली आणि फलंदाजीला शिवम दुबे आला. त्याने बोल्टचा ५वा चेंडू खेळला आणि स्ट्राईक डिविलियर्सकडे सोपविली.
यानंतर बोल्टच्या ६ व्या चेंडूवर डिविलियर्सने पुनरागमन करत जोरदार फटका मारला आणि चेंडूला बाऊंड्रीच्या पलीकडे षटकारासाठी पाठवले. हा षटकार मारत त्याने दाखवून दिले की हेल्मेटवर चेंडू मारण्याची हिंमत न केलेलीच बरी.
त्याच्या या षटकारानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन खेळी दाखविण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये एका बाजूला मुंबईविरुद्धचा सामना आहे, तर दुसऱ्या बाजूला सीपीएलमधील एक सामना आहे. या दोन्ही व्हिडिओंमध्ये डिविलियर्सच्या हेल्मेटला चेंडू लागलेला दिसतोय. त्यानंतर डिविलियर्सने पुढच्या काही चेंडूंमध्येच त्या गोलंदाजाला षटकार ठोकला आहे.
https://twitter.com/__mubean__/status/1310818608960778243
डिविलियर्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये १५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४०.४९ च्या सरासरीने ४५३५ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ३ शतके आणि ३५ अर्धशतके ठोकली आहेत. यासोबतच त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत २१९ षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल
-मॅच टाय झाल्यावर सुपर ओव्हर, पण सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यावर काय?? जाणून घ्या
-…आणि ‘त्याने’ ३५ व्या अर्धशतकासाठी केवळ २ धावा कमी असताना जडला षटकार, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
-असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
-जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…
-परिस्थितीने घडवलेला जगातील सर्वोत्तम ऑफस्पिनर, ज्याचा इकॉनॉमी रेट होता २ पेक्षाही कमी