भारतीय क्रिकेट संघाने ज्या प्रकारे यजमान इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी जिंकली तो प्रसंग ऐतिहासिक आणि अविस्मरणीय आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविषयी या सामन्यानंतर खूप बोलले जात आहे. त्याने दुसऱ्या डावात ज्या प्रकारे गोलंदाजी केली ती अप्रतिम होती. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खाननेही त्याचे कौतुक करतांना म्हटले आहे की आता इंग्लिश संघ या गोलंदाजाला कधीही क्रोधीत करण्याची संधी देणार नाही.
झहीर म्हणाला, “जर तो रागातही स्वत: ला सांभाळून इतका चांगला खेळू शकतो आणि असे जबरदस्त प्रदर्शन करू शकतो, तर मला वाटते की त्याला विरोधी संघाने त्याला कधीकधी अशाप्रकारे डिवचले तर काही हरकत नाही. त्याला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही याचा त्रास त्याला झाला, असावा कारण तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. अशा गोष्टींचा चांगल्या खेळाडूंना त्रासच होतो.”
“या सर्व गोष्टींनंतर, जेव्हा अँडरसनचा किस्सा घडला तेव्हा फलंदाजी करताना बुमराहला ज्या प्रकारे बाउंसर टाकण्यात आले आणि इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी ज्याप्रकारे त्याच्याविरुद्ध एकवटले होते, या सगळ्या गोष्टींनी त्याला प्रेरणाच दिली आणि त्याने त्याचा राग योग्य प्रकारे वापरला. इंग्लंडचा संघ विचार करत असेल की आता आपण बुमराहला बाउंसर टाकण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्याच्या पासून दोन हात लांब राहण्यातच आपले शहाणपण आहे. त्याने ज्या त्वेषाने गोलंदाजी आणि फलंदाजी केली ते खूप स्तुत्य आहे.”
तो पुढे म्हणाला, “हळुवार गोलंदाजी करणे अतिशय आव्हानात्मक असते, पण राउंड द विकेट जाऊन गोलंदाजी करणे, त्यातही फलंदाजाला पायचीत करणे, हे महाकठीण काम बुमराहने केले आहे. जेव्हा तुम्ही राऊंडर द विकेट गोलंदाजीला जाता, तेव्हा फलंदाजाला असेच वाटते की अधिकाधिक बाऊन्सर येणार आहेत. बुमराहने आपल्या खेळीने मला खूप प्रभावित केले आहे.”
बुमराहने लॉर्ड्समध्ये झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात मोहम्मद शमीसह ९ व्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केली होती. ज्यामुळे भारताने इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघ १२० धावांत गुंडाळला गेला. त्यामुळे भारताने हा सामना १५१ धावांनी जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या –
पुजारा किंवा रहाणे नव्हे तर, हेडिंग्ले कसोटीत ‘या’ खेळाडूला द्या संधी, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
‘या’ कारणामुळे १० वर्षांपूर्वी आजचा दिवस महेंद्रसिंग धोनीसाठी ठरला होता काळा दिवस