पुणे, 13 ऑक्टोबर 2023: आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाज याने एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, भूषण अकुत, एजस छटवाल, नरेंदर जनवेजा यांनी विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 65 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित अजित भारद्वाजने दुसऱ्या मानांकित मुर्थती सुरेशचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात अंतिम फेरीत अजित भारद्वाज व मुर्थती सुरेश या जोडीने सुरेश आलापती व राजेश कुमार यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
55 वर्षावरील एकेरीत अंतिम लढतीत अव्वल मानांकित भूषण अकुत याने तिसऱ्या मानांकित आलोक भटनागरचा सुपरटायब्रेकमध्ये 6-1, 5-7, 10-8 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. 70 वर्षांवरील गटात एकेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित एजस छटवालने जॉर्ज थॉमस पुथापारंबिलचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 75 वर्षांवरील गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित नरेंदर जनवेजाने श्रीकांत पारेखचा 7-5, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
60 वर्षांवरील एकेरी गटात उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित नागराज रेवणसिद्दैयाने शरद टाकचा 6-1, 6-3 असा तर, दुसऱ्या सामन्यात चौथ्या मानांकित संजय कुमारने सहाव्या मानांकित लक्पा शेर्पाचा 3-6, 6-1, 10-7 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, स्पर्धा संचालक रामा राव डोसा, सुपरवायझर अमित देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. Double crown for Ajit Bhardwaj at MT ITF S400 Senior Tennis Championships)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 55 वर्षावरील एकेरी: अंतिम फेरी:
भूषण अकुत(भारत)[1]वि.वि.आलोक भटनागर( भारत)[3] 6-1, 5-7, 10-8;
60 वर्षांवरील एकेरी गट: उपांत्य फेरी:
नागराज रेवणसिद्दैया(भारत)[5] वि.वि.शरद टाक( भारत)[8] 6-1, 6-3;
संजय कुमार( भारत)[4]वि.वि.लक्पा शेर्पा(भारत)[6] 3-6, 6-1, 10-7;
65 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
अजित भारद्वाज( भारत)[1]वि.वि.मुर्थती सुरेश(भारत)[2]6-3, 6-3;
70 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
एजस छटवाल(अमेरिका)[2]वि.वि.जॉर्ज थॉमस पुथापारंबिल( भारत) 6-4, 6-1;
75 वर्षांवरील गट: अंतिम फेरी:
नरेंदर जनवेजा(भारत)[1]वि.वि.श्रीकांत पारेख( भारत) 7-5, 6-1;
70 वर्षांवरील दुहेरी गट: उपांत्य फेरी:
अजित पेंढारकर( भारत)/राजेंद्रसिंग राठोड( भारत) वि.वि.रामाराव डोसा( भारत)/एसजेएस रंधावा( भारत) 6-4, 2-6, 10-5;
एजस छटवाल(अमेरिका)/नरेंद्र जनवेजा( भारत)वि.वि.राघवराव पासला( भारत)/धनंजय सुमंत( भारत) 6-3, 6-4;
65 वर्षांवरील दुहेरी गट: अंतिम फेरी:
अजित भारद्वाज( भारत)/ मुर्थती सुरेश( भारत)[1]वि.वि. सुरेश आलापती(भारत)/राजेश कुमार(भारत)[2] 6-1, 6-0.
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ, स्पर्धेत राज्यातील सुमारे १५० खेळाडू सहभागी
‘गोलंदाजी आता त्यांची कमजोरी बनली आहे’, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिग्गजाचं पाकिस्तान संघाविषयी मोठं वक्तव्य