पुणे। एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत 35वर्षांवरील गटात पुण्याच्या केतन धुमाळ, 45वर्षांवरील गटात नितीन कीर्तने, तर 65वर्षांवरील पुरुष एकेरीत योगेश शहा यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत केतन धुमाळ याने तिसऱ्या मानांकित अर्जुन उप्पलचा 6-2, 6-1 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत केतन धुमाळने अभिषेक ताम्हाणेच्या साथीत सुजय महादेवन व अर्जुन उप्पल या चौथ्या मानांकित जोडीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद मिळवले.
45वर्षांवरील पुरुष एकेरीत अंतिम फेरीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने दुसऱ्या मानांकित सुनील लुल्लाचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम लढतीत नितीन किर्तने व प्रशांत सुतार यांनी सुनील लुल्ला व गगनदीप वासू यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 65वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित योगेश शहा याने पाचव्या मानांकित एकनाथ किणीकरचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 7-6(4) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे प्रायोजक बाबा रॉड्रिक्स, सुभाष सुतार, स्पर्धा संचालक डीएस रामा राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 35वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:
केतन धुमाळ(भारत)वि.वि.अर्जुन उप्पल(भारत)[3] 6-2, 6-1;
महिला 35: राउंड रॉबिन:
प्रियांका मेहता(भारत)[1]वि.वि.गायत्री मेवाडा(भारत)6-3, 6-1;
प्रणिता पेडणेकर(भारत) पुढे चाल वि. रिंकू कुमारी(भारत)
40वर्षावरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.सुरेंद्र अल्लम(भारत)[8] 6-0, 6-1;
मंदार वाकणकर(भारत)[4] वि.वि. रमजान शेख(भारत)[5] 6-1, 6-2;
स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[3]वि.वि.बद्री विशाल(भारत)[6] 6-4, 6-2;
नीरज आनंद(भारत)[7]वि.वि.कमलेश शुक्ला(भारत) 6-4, 6-2;
45वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:
नितीन कीर्तने(भारत)[1]वि.वि.सुनील लुल्ला(भारत)[2] 6-0, 6-1;
महिला 45वर्षांवरील: राउंड रॉबिन:
मायुक्ता सकाय(जपान)[1] पुढे चाल वि.प्रेरणा आपटे(भारत)
नंदिता नूलकर(भारत)वि.वि.सोनिया बिजू सॅम्यूअल(भारत) 6-2, 6-3;
55वर्षांवरील पुरुष:उपांत्य फेरी:
आलोक भटनागर(भारत)वि.वि. उल्हास फुलझेली(भारत)6-1, 6-4;
अजय कामत(भारत)वि.वि. आशिष डिके(भारत)[3] 6-1, 6-1;
65वर्षांवरील पुरुष:अंतिम फेरी:
योगेश शहा(भारत)[1]वि.वि.एकनाथ किणीकर(भारत)[5] 7-6(2), 7-6(4);
70वर्षांवरील पुरुष: उपांत्य फेरी:
ताहीर अली(भारत)(1)वि.वि. रत्नाकरराव आनी(भारत)[4] 6-1, 6-0;
रामराव दोसा(भारत)(3) वि.वि. धवल पटेल(भारत)(2) 6-1, 6-1.
दुहेरी: 35 वर्षांवरील पुरुष एकेरी: अंतिम फेरी:
केतन धुमाळ/अभिषेक ताम्हाणे वि.वि.सुजय महादेवन/अर्जुन उप्पल[4] 6-3, 6-2;
40 वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
कमलेश शुक्ला/मंदार वाकणकर[2] वि.वि.पार्थसारथी मोहपात्रा/प्रफुल नागवाणी 6-1, 6-2;
45वर्षांवरील पुरुष: अंतिम फेरी:
नितीन किर्तने/प्रशांत सुतार(भारत)वि.वि.सुनील लुल्ला/गगनदीप वासू(भारत)6-1, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
एमआरएफ मोग्रिप राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा शनिवारी पुण्यात रंगणार
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेस प्रारंभ