पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात येवल्याच्या लक्ष गुजराथी याने तर, मुलींच्या गटात पुण्याच्या देवांशी प्रभुदेसाई यांनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईने आपली विजयी मालिका कायम ठेवत अभिलिप्सा मल्लिकचा 6-0, 6-0असा एकतर्फी पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. दुहेरीत अंतिम फेरीत देवांशी प्रभुदेसाईने साईइति वराडकरच्या साथीत आर्या शिंदे व रिद्धी शिंदे यांचा 6-3, 6-0 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित येवल्याच्या लक्ष गुजराथीने पुण्याच्या ओमकार शिंदेचा 6-3, 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकवले. लक्ष विद्या इंटरनॅशनल शाळेत दहावी इयत्तेत शिकत असून नवभारत क्रीडा मंडळ येथे सराव करतो. दुहेरीत अंतिम लढतीत लक्ष गुजराथी व स्वराज ढमढेरे या अव्वल मानांकित जोडीने अर्जुन कीर्तने व अद्विक नाटेकर यांचा 6-3, 7-6(8-6) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य आरजी परदेशी, फर्ग्युसन कॉलेजच्या क्रीडा विभागाचे संचालक गौतम सोनावणे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन किशोर पेंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संग्राम चाफेकर, नमिता बाळ, प्रविण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी):
मुले: लक्ष गुजराथी[1] वि.वि.ओमकार शिंदे 6-3, 6-3;
मुली: देवांशी प्रभुदेसाई[4] वि.वि.अभिलिप्सा मल्लिक 6-0, 6-0;
दुहेरी: मुले: अंतिम फेरी: लक्ष गुजराथी/स्वराज ढमढेरे[1] वि.वि.अर्जुन कीर्तने/अद्विक नाटेकर 6-3, 7-6(8-6);
मुली: देवांशी प्रभुदेसाई/साईइति वराडकर[1] वि.वि.आर्या शिंदे/रिद्धी शिंदे 6-3, 6-0.
महत्त्वाच्या बातम्या –
वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज: पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीला दुहेरी मुकुट
बेंगलोरला राजस्थानविरुद्ध भोवल्या तीन मोठ्या चुका, ज्यामुळे आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा भंगलं
IPL Final । ‘उद्या रॉयल संघच जिंकेल फायनल’, राजस्थानच्या गोटातील दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी