पुणे । सिमरन धिंग्रा हिने महाराष्ट्रीय मंडळाच्या हौशी खेळाडूंसाठीच्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळवला. तिने स्पर्धेतील १५ आणि १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. यानंतर विराज सराफ, कोनार्क इंचेकर, स्वामिनी तिकोने, ओम होजगे, रूचिर प्रभुणे, सोयरा शेलार यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद पटकावले.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमीच्या सहकायार्ने व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होत असलेली ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सिमरन धिंग्राने नंदिनी भार्गववर १६-१४, १५-१२ अशी मात करून जेतेपद पटकावले.
यानंतर सिमरनने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत सान्वी राणेवर १२-१५, १५-८, १५-९ अशी ३३ मिनिटांत मात करून दुहेरी यश संपादन केले. स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम फेरी विराज सराफने नील जोशीवर १५-९, १५-१२ असा विजय मिळवला, तर मुलींच्या गटात सोयरा शेलारने ख्याती कत्रेवर १५-११, १८-२०, १५-८ अशी मात केली.
स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत कोनार्क इंचेकरने सुदीप खोरटेवर १०-१५, २०-१८, १५-१३ असा विजय मिळवला. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत स्वामिनी तिकोने हिने युतिका चव्हाणचे आव्हान ९-१५, १६-१४, १५-९ असे परतवून लावले.
यानंतर १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत ओम होजगेने बाजी मारली. त्याने अंतिम फेरीत जॉचिम जॉनवर १५-१२, १५-११ असा विजय मिळवला. यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात रुचिर प्रभुणेने विजेतेपद मिळवले. मुलांच्या गटातील अंतिम फेरीत प्रभुणेने अथर्व अल्वानीचे आव्हान १०-१५, १५-१०, १५-११ असे परतवून लावले.
अंतिम फेरीचे निकाल।
११ वर्षांखालील मुले – विराज सराफ वि. वि. नील जोशी १५-९, १५-१२.
११ वर्षांखालील मुली – सोयरा शेलार वि. वि. ख्याती कत्रे १५-११, १८-२०, १५-८.
१३ वर्षांखालील मुले – कोनार्क इंचेकर वि. वि. सुदीप खोरटे १०-१५, २०-१८, १५-१३.
१३ वर्षांखालील मुली – स्वामिनी तिकोने वि. वि. युतिका चव्हाण ९-१५, १६-१४, १५-९.
१५ वर्षांखालील मुले – ओम होजगे वि. वि. जॉचिम जॉन १५-१२, १५-११.
१५ वर्षांखालील मुली – सिमरन धिंग्रा वि. वि. नंदिनी भार्गव १६-१४, १५-१२.
१७ वर्षांखालील मुले – रुचिर प्रभुणे वि. वि. अथर्व अलवाणी १०-१५, १५-१०, १५-११.
१७ वर्षांखालील मुली – सिमरन धिंग्रा वि. वि. सान्वी राणे १२-१५, १५-८, १५-९.
मिश्र दुहेरी – शुभम शिंदे – सई जाधव वि. वि. अभिलाष नायर – सुमित्रा हांगर्गेकर १५-१२, १५-११.
पुरुष दुहेरी – अक्षय दाते – निनाद द्रविड वि. वि. अद्वैत साठे – रक्षित प्रभू १५-१७, १५-१२, १५-११.
४० वर्षांवरील पुरुष दुहेरी – चिंतामणी एल. – संजीव कुलकर्णी वि. वि. अजय रावळ – संदीप डांगी १५-१०, १५-८.
महिला दुहेरी – ऐश्वर्या बांदल – उन्नती मुनोत वि. वि. रक्षा पंचांग – सान्वी राणे ११-१५, १५-७, १५-८.